उत्कृष्ट संसदपटू’ व ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार१२ आमदारांना

0
78

मुंबई, दि. ३ – पुणे-राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांना सन २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट संसदपटू’ व ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण येत्या मंगळवारी (दि. ३ सप्टेंबर) दुपारी ३.३० वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे.

या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या ग्रंथाचे प्रकाशनदेखील करण्यात येणार आहे.

विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, नियमांचे काटेकोर पालन, विधिमंडळात उपस्थित करावयाच्या विषयांचे आकलन, विषय मांडताना वापरलेले ज्ञान, कौशल्य, निवडलेले मुद्दे, वक्तृत्व शैली, दर्जेदार उत्कृष्ट भाषणे या सर्व गोष्टी पडताळन पाहन तज्ज्ञा समितीकडून या पुरस्कारांची शिफारस केली जाते. त्यानुसार राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात.

रविवारी २०१८ पासून प्रलंबित असलेले हे पुरस्कार एकूण ५३ सदस्यांना जाहीर झाले.

उत्कृष्ट संसदपटू – बाळासाहेब थोरात (काँग्रेस), डॉ. संजय कुटे (भाजप)

उत्कृष्ट भाषण – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी), पराग अळवणी (भाजप)

विधान परिषद :

उत्कृष्ट संसदपटू – डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना), निरंजन डावखरे (भाजप)

उत्कृष्ट भाषण – हुस्नबानू खलिफे (काँग्रेस), सुजितसिंह ठाकूर (भाजप)

विधानसभा 2019-20

उत्कृष्ट संसदपटू – प्रकाश आबिटकर (शिवसेना), आशिष शेलार (भाजप)

उत्कृष्ट भाषण – सुनील प्रभू (शिवसेना), दिलीप मोहिते पाटील (राष्ट्रवादी)

विधान परिषद :

उत्कृष्ट संसदपटू – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी), अनंत गाडगीळ (काँग्रेस)

उत्कृष्ट भाषण – रामहरी रूपनवार (काँग्रेस), श्रीकांत देशपांडे (अपक्ष)

विधानसभा 2020-21

उत्कृष्ट संसदपटू – अमित साटम (भाजप), आशिष जयस्वाल (अपक्ष)

उत्कृष्ट भाषण – प्रताप सरनाईक (शिवसेना), प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)

विधान परिषद :

उत्कृष्ट संसदपटू – प्रवीण दरेकर (भाजप), विनायक मेटे (शिवसंग्राम)

उत्कृष्ट भाषण – मनीषा कायंदे (शिवसेना), बाळाराम पाटील (शेकाप)

विधानसभा 2021- 22

उत्कृष्ट संसदपटू- संजय शिरसाट (शिवसेना), प्रशांत बंब (भाजप)

उत्कृष्ट भाषण – सरोज अहिरे (राष्ट्रवादी), सिद्धार्थ शिरोळे (भाजप)

विधान परिषद :

उत्कृष्ट संसदपटू – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी), सदाभाऊ खोत (भाजप)

उत्कृष्ट भाषण – गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना), विक्रम काळे (राष्ट्रवादी)

विधानसभा 2022- 23

उत्कृष्ट संसदपटू- भरत गोगावले (शिवसेना), चेतन तुपे (राष्ट्रवादी), समीर कुणावार (भाजप)

उत्कृष्ट भाषण – यामिनी जाधव (शिवसेना), अभिमन्यू पवार (भाजप)

विधान परिषद :

उत्कृष्ट संसदपटू – प्रसाद लाड (भाजप), महादेव जानकर (राष्ट्रीय समाज पक्ष)

उत्कृष्ट भाषण – बाबाजानी दुर्रानी (राष्ट्रवादी), प्रज्ञा सातव (काँग्रेस)

विधानसभा 2023- 24

उत्कृष्ट संसदपटू – रमेश बोरनारे (शिवसेना), अमिन पटेल (काँग्रेस), राम सातपुते (भाजप)

उत्कृष्ट भाषण – कुणाल पाटील (काँग्रेस), श्वेता महाले (भाजप), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)

विधान परिषद :

उत्कृष्ट संसदपटू- अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), गोपीचंद पडळकर (भाजप), रमेश पाटील (भाजप)

उत्कृष्ट भाषण – आमशा पाडवी (शिवसेना), श्रीकांत भारतीय (भाजप)