आदित्य ठाकरे दावोसला बर्फात कोणाबरोबर खेळत होते…

bpcauthor bpcauthor
1 Min Read

ठाणे, दि. १६ (पीसीबी) : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना दावोसला उद्योग मंत्र्यांनी जाणे अपेक्षित होते. पण, त्यावेळेस आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री असतानाही दावोसला गेले होते. या काळात उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रीया होणार होती. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे हे दावोस दौऱ्यावर निघून गेले होते आणि दौरा संपल्यानंतरही ते काही दिवस तेथून परतलेच नव्हते, असा आरोप शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी ठाण्यात केला. तसेच दावोसाला ते कुणाबरोबर बर्फात खेळत होते, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे गेले आहेत. या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे हे त्यांच्यावर टीका करीत आहेत. त्याला शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी दावोस येथे उद्योग मंत्र्यांनी जाणे अपेक्षित होते. पण, त्यावेळेस आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री असतानाही दावोसला गेले होते. लहान मुले खाऊसाठी हट्ट करतात, तसा हट्ट करून ते दावोसला गेले होते. याचा त्यांना विसर पडला असून त्यांना स्मृतीभ्रंश झाल्याची टीका म्हस्के यांनी केली.

Share This Article