देवेंद्र फडणवीस मोठ्या अडचणीत, भाजपसुध्दा भाकरी फिरवण्याच्या तयारीत

0
450

मुंबई, दि. १० (पीसीबी) – केंद्रातील नेत्यांकडे काही नकारात्मक सर्वेक्षण अहवाल पोचल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत आल्याचे वृत्त आहे. भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा असे नेते म्हणून तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणूनही काही विशिष्ट हेतुनेच त्यांची कोंडी कऱण्यात आली असावी असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. राज्याचा मंत्रीमंडळ विस्तारात फडणवीस यांनी जी नावे सुचविली होती त्यांना स्पष्ट शब्दांत नकार आल्यानेच आता त्यांची पूरती कोंडी झाली आहे. कदाचित केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात भाजपचा एखादा मराठा चेहरा म्हणजे विनोद तावडे किंवा आशिष शेलार यांच्याकडे राज्य भाजपची पूर्ण जबाबदारी सोपवून फडणवीस यांचे दिल्लीत पुनर्वसन कऱण्याच्या हालचाली सुरू आहेत

भाजपचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते म्हणूनच फडणवीस यांचे नाव आहे. २०१४ ची निवडणूक त्यांनी एकहाती जिंकली आणि राज्यात सत्ता आणली होती. पुढे २०१९ च्या निवडणुकीतही त्यांच्याच शब्दाला दिल्लीत किंमत होती. पूर्वी ते राज्यात प्रदेशाध्यक्ष असतानाही ते सांगतील तो शब्द प्रमाण होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर जी नावे चर्चेत असतं त्यातही फडणवीस यांचे नाव होते. आता ती परिस्थिती बदलली आहे.

मागच्या निवडणुकित म्हणजे २०१९ मध्ये हार खाल्ली आणि विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. तेव्हा ते विरोधी बाकावर पण काहीसा आक्रस्ताळेपणा त्यांच्या कामातून दिसला. सत्तेसाठी शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना बाहेर काढण्याची जी पध्दत होती ती सामान्य जनतेला रुचली नाही आणि त्यात भाजपची नाहक बदनामी झाली. शिवसेनेतून ४० आमदार फोडले आणि नंतर सेनेचे चिन्ह गोठविले, नाव घालवले आदी घडामोडींचाही लोकांमध्ये नकारात्मक संदेश गेला आणि आता त्याची सहानुभूती शिवसेनेलाच मिळते आहे. भविशष्यात हे राजकणऱा अंगलट येऊ शकते, याचा अंदाज दिल्लीतील नेत्यांना आल्याने ते फडणवीस यांच्यावर नाराज आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकित भाजपला खप कमी जागा मिळथ असल्याचा अंदाज एका पाहणीत आला आहे. त्यामुळे मोदी-शाह यांच्या मनात आता फडणवीस यांच्याबद्दलच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. पुन्हा भाजप सत्तेत आणण्यासाठी २०२४ ला सर्वाधिक खासदारांची गरज आहे. त्यासाठी काय करावे लागेल यावर भाजमध्ये मंथन सुरू झाल्याने आता भाजपसुध्दा महाराष्ट्रात भाकरी फिरवण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिल्लीमधील राजकीय विश्लेषक सांगतात.

देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात मोठ्या दोन चुका झाल्या. त्यांनी आपले मुख्यमंत्रीपदाचे प्रतिस्पर्धी संपविण्याच्या नादात पंकजा मुंडे यांना डावलले. विधानसभेला चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी न देऊन विदर्भातील ओबीसींना नाराज केले. धनगर सामाजाचे महादेव जानकरसुध्दा पक्षापासून दूर गेले. जो ओबीसी समाज भाजपचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे तोच निसटल्याने भाजपला धोका संभवतो, असे समोर आले. दुसरी मोठी चूक म्हणजे आरक्षणाच्या मुद्यावर आश्वासन पूर्तता न झाल्याने मराठा समाजसुध्दा भाजप पासून फटकून आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा वगळून राजकारण कऱणे अशक्य, पण फडणवीस यांनी तोही प्रयोग केल्याने तिथेही तोटा झाला. राज्यातील अनेक मराठा घराणी फोडून भाजपमध्ये सामिल करून घेतल्याने त्याचाही फटका बसला. आज १०५ आमदारांपैकी तब्बल ४० आमदार हे फडणवीस यांच्याबद्दल कुरकूर करतात. फडणवीस यांची कार्यपध्दती पक्ष विस्तारात मोठा अडथळा ठरत असल्याचे या आमदारांनी थेट अमित शाह यांच्याकडे गोपनिय पध्दतीने कळविले. त्यासाठीच गेल्या आठवड्यात शाह यांच्याकडे स्वतंत्र बैठक होती, असेही समोर आले आहे.

भाजप ही तशी २४ तास निवडणूक सज्ज पार्टी आहे. त्या अनुशंगाने वारंवार सर्वेक्षण सुरू असते. अशाच पध्दतीचा एक सर्वे अहवाल नुकताच बाहेर फुटला. तो सर्वेक्षण अहवाल तावडे यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यात भाजपच्या खासदारांची मोठी घट होईल, असा अंदाज समोर आला. आज ४० खासदार आहेत ते २५ पर्यंत कमी होतील असे अहवालात म्हटल्याने मोदी-शाह यांच्या पायाखालची वाळू सरकली. इतकेच नाही तर आगामी विधानसभेलासुध्दा भाजपच्या जागा खूप कमी होतील, असेही निष्कर्ष आले आहेत. या सर्व मुद्यांमुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपच्या काही आमदारांनी फडणवीस यांच्या कामकाजाबद्दल नापसंती तक्रार शाह यांच्याकडे गोपनिय पध्दतीने केली आहे. जात समिकऱण सांभाळायला पाहिजे त्यातही अयशस्वी ठरले. लोकांचा पाठिंबा मिळत नाही. काही जातींना मदत तर काहींना बाजुला ठेवण्याचा फटका बसू शकतो.

अलिकडे दिल्लीत काहीतरी मोठ्या घडामोडी सुरू आहेत. दिल्लीचे अनेक पत्रकारसुध्दा याच विषयावर बोलत असतात. छोटे-मोठे यू ट्यूब चॅनलसुउध्दा फडणवीस अडचणीत असल्याचा हवाला देतात. जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे आता फडणवीस यांची बाजू लावून धरणारे विश्लेषण करतात. त्यामुळेच भाजपसुध्दा आता भाकरी फिरवण्याच्या मनस्थितीत आली आहे, असे दिसते.