शरद पवार यांच्या `त्या` वक्तव्यानंतर संजय राऊत यांची धावपळ

1 Min Read

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच सांगू शकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राज्यात पवारांच्या वक्तव्यानंतर उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवार यांच्याशी तातडीनं संवाद साधला असल्याची माहिती समोर आली आहे. राऊत यांनी याबद्दल माहिती दिली. राऊत यांची धावपळ सुरू असल्याचे समजले. आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यावरून मविआची युती तुटावी असं मला कधी वाटलं नाही”, असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

राऊत यांनी पवारांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अनेकदा त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेतोय? तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठी. १ मे रोजी मुंबईत मविआची ऐतिहासिक सभा होत आहे. त्या सभेला तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित राहतील. पुणे, कोल्हापूर अशाही सभा होणार आहेत.

Share This Article