‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर २९५ सदनिकांच्या विक्रीसाठी

1 Min Read

दि.२५(पीसीबी)- पुणे येथे म्हाडा अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर २९५ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही योजना सर्वसाधारण प्रवर्गातील गरजू आणि पात्र नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे.
म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सदनिका १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आहेत.

यापूर्वी या योजनांतील सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली होती. मात्र, काही घरांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्या रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे आता या उर्वरित सदनिकांची विक्री थेट ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ या पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विकसकाकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे या सदनिकांचे वितरण करण्यात येणार असून, इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

Share This Article