पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात

1 Min Read

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात एकूण १५ हजार ३०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस दलात ४६२ पदांची भरती केली जात आहे. या भरतीला बुधवार (११ फेब्रुवारी) पासून सुरुवात झाली आहे. इंद्रायणी नगर भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडांगण येथे मैदानी चाचणी केली जात आहे. मैदानी चाचणीसाठी दररोज ५०० ते ८०० उमेदवार बोलावले जात आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी शारीरिक चाचणी भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील मैदानावर होणार आहे. या मैदानावर यापूर्वीच्या पोलिस भरतीसाठीची मैदानी आणि शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. या मैदानात सिंथेटिक ट्रॅक आहे. या मैदानावरील यंदा होत असलेल्या भरतीच्या मैदानी चाचणीसाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही, आरएफआयडी, बायोमेट्रिक्स आदींचा वापर केला आहे. तसेच लेखी परीक्षेतही गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

पोलिस होण्यासाठी उमेदवारांना ५० गुणांची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. यात पुरुषांसाठी १६०० मीटर, १०० मीटर धावणे, तसेच गोळाफेक चाचणी घेतली जाईल. महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी घेतली जाणार आहे. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना उपलब्ध जागांनुसार एकास दहा या प्रमाणात गुणानुक्रमे लेखी परीक्षेला बोलविले जाणार आहे.

Share This Article