खळबळ… घरात आढळला कुजलेल्या अवस्थेतील जेष्ठ अभिनेत्रीचा मृतदेह

bpcauthor
1 Min Read

मुंबई, दि. २१ : पाकिस्तान सिनेइंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आयशा खान त्यांच्या कराचीमधील घरात मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्या ७७ वर्षांच्या होत्या. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. आयशा खान गुलशन-ए-इकबाल भागात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या घरातून दुर्गंधी आल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा आयशा खान यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू कसा झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आयशा खान यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या घरातून खूप वास येत होता. पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा आयशा खान मृतावस्थेत आढळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , त्यांचा मृतदेह जवळपास सात दिवसांपासून घरात होता.

Share This Article