राज कुशवाह केवळ प्यादा, सोनमच्या आयुष्यात तिसऱ्याच पुरुषाची एन्ट्री

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि . १२ ( पीसीबी )  – राजा रघुवंशी हत्याकांडात दररोज नवे खुलासे समोर येत असतानाच आता एक नवा धक्कादायक टर्न घेतला आहे. आतापर्यंत या प्रकरणात सोनम  आणि राज कुशवाह यांच्यातील कथित प्रेमसंबंध हेच मुख्य कारण मानले जात होते. पण पोलिस सूत्रांनुसार आता तिसऱ्या पुरुषाच्या उपस्थितीचा संशय अधिक गडद झाला आहे. 

राज फक्त एक प्यादा, सोनम मास्टरमाइंड? :

सोनम रघुवंशीच या संपूर्ण कटाची मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) आहे. राज कुशवाह हा फक्त एक प्यादा होता. सोनमने त्याला फसवून, त्याच्या प्रेमाचा वापर करून राजा रघुवंशीच्या  हत्येसाठी उपयोग केला. राज कुशवाहसोबत लग्न करण्याचं आश्वासन देत तिने त्याच्यावर नियंत्रण मिळवलं. इतर तिघा आरोपींना तिने पैशांचे आमिष दाखवले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम कोणत्या तिसऱ्या व्यक्तीसोबत पळून जाण्याच्या तयारीत होती, असा संशय आहे. या तिसऱ्या व्यक्तीबद्दल सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण हा खरा मास्टरप्लॅनर असू शकतो. राज कुशवाहला  या संपूर्ण कटाची पूर्ण कल्पनाही नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे तो सोनमच्या सांगण्यानुसार अंधपणे पुढे जात होता.

 तिने पतीची हत्या कोणासाठी केली? :

या प्रश्नाचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे. सोनमच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि तिने काम केलेल्या प्लायवूड कंपनीतील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की, राज आणि सोनममध्ये कोणतेही प्रेमसंबंध नव्हते. उलट सोनमने राजला “दीदी” म्हणून संबोधले जायचे, आणि राखी देखील बांधली होती. त्यामुळे राज आणि सोनमच्या नात्याच्या स्वरूपावरही अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.

सोनमने राजाच्या खुनामागे नेमकं कोणतं कारण दिलं, आणि ती नक्की कोणासाठी हे करत होती, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र एक गोष्ट मात्र आता स्पष्ट होत आहे ही हत्या पूर्णपणे नियोजित  आणि अनेक पातळ्यांवर फसवणूक करणारी होती.

Share This Article