मुंडे, टिळेकर, गोरखे, सातव यांच्यासह ११ आमदारांना शपथ

1 Min Read

विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील उपस्थित होते. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडणूक आले होते. तर शेकपाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता.

शपथ घेणाऱ्या आमदारांची नावे
1- पंकजा मुंडे – भाजप

2- योगेश टिळेकर – भाजप

3- अमित गोरखे – भाजप

4- परिणय फुके – भाजप

5- सदाभाऊ खोत – भाजप

6- भावना गवळी – शिंदे शिवसेना

7- कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना

8- शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

9- राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

10- प्रज्ञा सातव – काँग्रेस

11- मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष

Share This Article