स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई

पिंपळे निलख, दि. ६ (पीसीबी) – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली आहे. ही कारवाई पिंपळे निलख येथील जे पी फॅमिली स्पा येथे करण्यात आली.

स्पा चालक मालक जया अशोक जाधव (वय 33, रा. बोपोडी, पुणे), निखिल मोहन नवघन (वय 31, रा. लक्ष्मी नगर, थेरगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

इंगवले नगर, पिंपळे निलख येथे जे पी फॅमिली स्पा येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यावेळी स्पा सेंटरमध्ये तीन महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केल्याचे निदर्शनास आले. त्या तीनही महिलांची सुटका करून स्पा सेंटर चालक मालक आणि एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Share This Article