राज ठाकरे रविवारी पुणे दौऱ्यावर

1 Min Read

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या रविवारी पुणे शहर दौऱ्यावर येणार आहेत. मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित असणार आहेत. वसंत मोरे यांनी डॉग पाँड कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी वसंत मोरेंना 26 तारखेची दिली होती. उद्या सकाळी 10 वाजता राज ठाकरे पुण्यात येणार आहेत.

दरम्यान, मनसेने पुण्यातील छोटा शेख सल्ला आणि थोरला शेख सल्ला या दर्ग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईतील माहिमची मजार काढण्याचा ठाकरे यांनी इशारा देताच दुसऱ्या दिवशी सरकारने कारवाई केल्याने आता पुणे शहरातील दर्ग्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. त्यातचं राज ठाकरेंचा उद्या पुणे दौरा होतोय, ते काय बोलतात याची उत्कंठा कार्यकर्त्यांना आहे.

पुण्येश्वर मंदिरासंदर्भात एका महिन्याच्या आत कारवाई करा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार, असा इशारा मनसेच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. पुण्येश्वर मंदिराच्या कारवाई संदर्भात मनसेचा राज्य सरकारला एका महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणूकीत पुण्येश्वर मंदिराच्या घोषणा दिल्या होत्या. या घोषणा राजकीय न राहता त्यावर थेट कारवाई व्हावी, मनसेची मागणी केली आहे.

Share This Article