बनावट कागदपत्रे बनवून माथाडी कामगार मंडळाची फसवणूक

PCB Admin
1 Min Read

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या नावाने बनावट लेटरहेड बनवून ते कंपनीत देऊन माथाडी कामगार मंडळाची फसवणूक केली. याप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू देवराम वाळुंज (वय ४३, रा. वडगाव मावळ) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इसमांनी पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या नावाने बनावट लेटरहेड, शिक्का तयार केला. त्यावर खोटी सही करून ते पत्र महाळुंगे येथील निपॉन एक्सप्रेस इंडिया प्रा ली या कंपनीत दिले. अज्ञात व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे माथाडी कामगार मंडळाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article