#BreakingNews | शिंदे गटाला मिळालं “हे” चिन्ह…!

1 Min Read

मुंबई , दि. ११ (पीसीबी) -निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ‘ढाल तलावर’ चिन्ह देण्यात आलं आहे. काल निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्हं रद्द करत आज नवीन चिन्ह पाठवण्यास सांगितले होते.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक चिन्हांसंदर्भात दोन स्वतंत्र ई-मेल निवडणूक आयोगाला पाठवले होते. दोन्ही ई-मेलमध्ये प्रत्येक तीन नवीन चिन्हांचा पर्याय सूचवल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये ढाल-तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचं झाड, रिक्षा, शंख आणि तुतारी असे पर्याय देण्यात आले होते.

संबंधित चिन्हांचा अर्थ सांगताना भरत गोगावले म्हणाले की, जनतेचं रक्षण करण्यासाठी ढाल आहे, तर शत्रू अंगावर आला तर त्यांच्यासाठी तलवार आहे. ‘सूर्य’ उगवल्याशिवाय आपला दिवस चांगला जाऊ शकत नाही, त्यासाठी ‘तळपता सूर्य’ हे चिन्ह सादर केलं आहे. तर ‘पिंपळ’ हे पवित्र झाड आहे. त्यामुळे आम्हाला काळजी करायचं काहीही कारण नाही. आम्हाला जे चिन्ह मिळेल ते घ्यायला आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया भगत गोगावले यांनी दिली आहे.

Share This Article