विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

1 Min Read

आळंदी, दि. २० (पीसीबी) – विवाहितेचा छळ करून तिला घरातून हाकलून दिले. विवाहिता घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना सासरच्या लोकांनी तिला स्थानिक गुंडांकडून चोप देण्याची धमकी देत शिवीगाळ आणि मारहाण केली. ही घटना 22 नोव्हेंबर 2021 ते 21 जून 2022 या कालावधीत आळंदी पोलीस ठाण्याच्या शेजारील घरात घडली.

चंद्रकांत दिनकर घोगरे, गिरीश चंद्रकांत घोगरे, महेश चंद्रकांत घोगरे, दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडीत विवाहितेने आळंदी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 19) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तु व तुझ्या नवऱ्याने घरात रहायचे नाही असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेला शिवीगाळ केली. खुर्ची फेकून मारली. विवाहितेची सामान घरातून बाहेर फेकण्याची धमकी देत तू इथे कशी राहते, तेच बघतो अशी धमकी दिली. आरोपींनी विवाहितेला घरातील बाथरूम वापरण्यास मनाई केली. विवाहितेने आळंदी पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दिली. पोलीस ठाण्यातून घरी गेल्यानंतर सासऱ्याने घराला कुलुप लावून घराचा ताबा घेत फिर्यादी यांना घराची चावी दिली नाही. तुला स्थानिक गुंडाकडून मार बसवेन अशी देखील आरोपींनी धमकी दिली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article