YES BANK घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांना लॉकडाऊनदरम्यान प्रवासाचे VIP पास देणे चांगलेच भोवले

0
369

 

मुंबई, दि.१० (पीसीबी) – DHFL चे प्रमोटर्स आणि YES BANK घोटाळ्यात आरोप असलेले कपील आणि धीरज वाधवान बंधू यांच्यासह कुटुंबियांना लॉकडाऊनदरम्यान प्रवासाचे VIP पास देणे चांगलच भोवले आहे.

या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत गृह विभाग विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्रालय आणि सरकारकडून याची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई कऱण्यात येईल असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख्य यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.