Pimpri

महाराष्ट्रात महिला पोलिसच असुरक्षित, दिवसा होतोय विनयभंग

By PCB Author

October 19, 2019

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, हे सतत घडणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या घटनांवरून स्पष्ट होते. मात्र, आता महिला पोलिसही सुरक्षित राहिल्या नसून भरदिवसा त्यांचाही विनयभंग होत आहे. अशीच घटना देहुरोड येथे शुक्रवारी (दि. १८) दुपारी घडली.

याप्रकरणी सुरेश इरन्ना सुपरे (वय ३८, रा. पारशी चाळ, देहूरोड) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला पोलिस देहूरोड येथे निवडणूक बंदोबस्तकामी कर्तव्य बजावत होती. त्यावेळी, मागील तीन दिवसांपासून पाठलाग करणाऱ्या सरेश याने वर्दीवर असलेल्या त्या महिला पोलिसांचा हात पकडून व अंगातील जॅकेट ओढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत देहूरोड पोलिस ठाण्यात आरोपी सुरेश याच्याविरोधात विनयभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.