आकुर्डी क्लब तर्फे वॉटर फ्युरीफायर भेट

139

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – लायन्स क्लब ऑफ आकुर्डीच्या वतीने आणि विजय एंटरप्राइजेसच्या पुढाकाराने परंदवाडी पोलीस चौकीला जल शुद्धीकरण संच भेट देण्यात आला.

यावेळी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, राजेंद्र कोळी, पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे, क्लबचे अध्यक्ष मोहन पाटील, सचिव अनिल दांदडे, खजिनदार विक्रम माने, हिरामण गवइ, श्रध्दा पेठे, गीता शर्मा, स्वाती माने, विजया पाटील, विठ्ठल झोडगे, सुजाता दांदडे, चंद्रशेखर पवार, शशांक फाळके उपस्थित होते.

पोलीस चौकीतील पोलीस बांधव आणि येणाऱ्या नागरीकांसाठी शुध्द पाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हे मशीन देण्यात आल्याची माहिती विक्रम माने यांनी दिली.

WhatsAppShare