निवडणूक विभागातर्फे वल्लभमगर एसटी आगारात मतदार जनजागृती

0
528

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी सुनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वल्लभमगर एस.टी आगार येथे मतदार जनजागृती sveep कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

२०१९ विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान टक्केवारी वाढविणेसाठी तसेच लोकशाही समृद्ध व बळकट करणेकरीता मतदानाविषयी नागरीकांचे प्रबोधन करणे, मतदार जागृती करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणेसाठी निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणुन वल्लभनगर एस.टी आगार येथे अधिकारी, कर्मचारी, प्रवाशांना मतदान करणेसाठी व इतरांचा मतदानामध्ये सहभाग वाढविणेसाठी स्वीप कक्ष प्रमुख मुकेश कोळप यांनी आवाहन करुन मतदानाची शपथ देण्यात आली.

त्यावेळी आगार व्यवस्थापक, सर्व कर्मचारी, प्रवाशी व नागरीक उपस्थित होते. निवडणुक विभागाचे मतदार नोंदणी अधिकारी सुनिल वाघमारे, sveep कक्षप्रमुख मुकेश कोळप यांनी मार्गदर्शन केले. तानाजी सावंत, सुशांत जोशी, विलास केंजळे, सुधीर दारोकार यांनी संयोजन केले.