Pimpri

U-12 व्हेरॉक कप स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर  अकॅडमीला विजेतेपद

By PCB Author

November 09, 2021

पिंपरी, दि.०९ (पीसीबी) : पारितोषिक वितरण पिं. चिं मनपा चे सहशहर अभियंता सतिश इंगळे व कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे तसेच ऍश्ले डिसुझा ह्यांच्या हस्ते व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे उपस्थितीत पार पडले,

दिलीप वेंगसरकर म्हणाले की, ‘खेळाडूंनी सातत्य राखण्याबरोबरच आपल्या खेळात सतत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहून अधिक खडतर परिश्रम घेऊन शारीरिक क्षमता वाढवून तंदुरुस्ती बरोबरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणेही गरजेचे आहे,कारण क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा सामन्यात कलाटणी देता येते.’ ,या समारंभास अकॅडमीचे प्रशिक्षक शादाब शेख,भुषण सूर्यवंशी ,चंदन गंगावणे आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते, सूत्रसंचालन डॉ. विजय पाटील ह्यांनी केले

सकाळच्या सत्रातील अंतिम सामना

आर्यन्स क्रिकेट अकॅडमी पराभूत विरुद्ध व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी

अंतिम सामनावीर  विरेन मिरजे व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी

स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज ओम पाटील वेंगसरकर अकॅडमी

सर्वोत्तम गोलंदाज अर्णव डेरे वेंगसरकर अकॅडमी

सर्वोत्तम क्षेत्ररक्षक दिया यादव आर्यन्स अकॅडमी

स्पर्धेचा सर्वोत्तम मानकरी खेळाडू ओम पाटील व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी