सरकार पुरग्रस्तांना काहीही कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

153

मुंबई, दि. १० (पीसीबी) – पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या अस्मानी संकटांमुळे नागरीकांची जी वित्तहानी झाली आहे, त्यातून त्यांना सावरण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे. राज्य सरकार पुरग्रस्तांना काहीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे.

गेले काही दिवसापासून प्रमाणापेक्षाही अधिक पाऊस पडत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुराने हहाकार केला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या शहरांना पुराचा मोठा फटका बसला आहे. एनडीआरएफटी टीम तेथे तैनात आहे. मदत कार्य सुरू आहे. आतापर्यंत लाखो लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवले आहे. राज्य सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे आणि पुरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.