पोलिसांची भीती न बाळगता समस्या सांगा – सतीश माने

0
588

वाकड, दि. ११ (पीसीबी) – तुमच्या अडचणी, समस्या नि:संकोच सांगा न सांगितल्यास सर्व सुरळीत राम राज्य सुरू असल्याचा आमचा समज होतो आणि मग नाहक त्रासाला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते, पूर्वीची आणि आताची परस्थिती खूप वेगळी असल्याने न घाबरता पोलिसांकडे बिदास्त या. असे आवाहन वाकड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी व्यापाऱ्यांना केले.

वाकड येथील मुकेश चौधरी या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबियांवर वर्गणी न दिल्याच्या रागातून टोळक्याने जीवघेना हल्ला चढविला या हल्ल्याच्या निषेधार्थ काळेवाडी येथे पिंपरी-चिंचवड व्यापारी आघाडी व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सभेला पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, जनहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष चौधरी, सुधीरकुमार अगरवाल, प्रकाश भंडारी, चंदारामजी भायल, उमेश चौधरी आदी मान्यवर उपास्थित होते.

माने पुढे म्हणाले “वर्गणीच्या नावाखाली नाहक त्रास देणाऱ्या मंडळांचे परवाने रद्द करू. निवंगुणे म्हणाले व्यापाऱ्यांनी एकी वाढवली पाहिजे पोलीस अधिकारी वर्दीतले माणूस आहेत तर आपण सर्व बिन वर्दीचे पोलीस आहोत त्यामुळे सर्व पोलिसांवर न ढकलता दक्ष आणि सतर्क राहून जबादारीने वागले पाहिजे.”

आम्ही वर्गणीला कधीच नाही म्हणत नाही, मात्र गुन्हेगारीच्या मार्गाने खंडणी वसूल करणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही असे म्हणत संतोष चौधरी यांनी निषेध व्यक्त केला. सभेत व्यापाऱ्यांनी पीडित मुकेश चौधरी यांच्या उपचारासाठी जमा केलेली १६७५० रुपयांची मदत याच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आली.

सभेला शहरातील तसेच वडारवाडी, शिवाजी नगर, औंध, पाषाण, बालेवाडी, बाणेर या भागातील संघटनेचे पदाधिकारी सुमारे पाचशेहुन अधिक व्यापारी उपस्थित होते. श्री आई माता मंदिर काळेवाडी कमिटीचे उपाध्यक्ष लालचंद काग यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले हिम्मत भाटी, सुरेश चौधरी, रमेश गेहलोत, केसाराम चौधरी, भुराराम भाटी, राजू चौधरी, रमेश घांची यांनी संयोजन केले. संघटनेचे उपाध्यक्ष सोमाराम राठोड यांनी सूत्रसंचालन केले.