PCMC – Pimpri Chinchwad Bulletin

कर संकलन विभागाकडेच पाणीपट्टी वसुली
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी पुरवठा विभागाकडून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसून थकबाकीही वाढत आहे. एकीकडे मिळकत करातून उत्पन्न वाढत असताना पाणीपट्टी मात्र थकीत राहत असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाणीपट्टी वसुली ही कर आकारणी व कर संकलन विभागाकडे देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. जेणेकरून मालमत्ता करासोबत पाणीपट्टीतूनही महापालिकेला आर्थिक हातभार लागेल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

शहरात सद्यस्थितीत 5 लाख 90 हजार मिळकती आहेत. शहरात घरगुती, व्यावसायिक मिळून असे 1 लाख 70 हजार 393 अधिकृत नळजोड आहेत. महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने गतवर्षी सव्वा सहाशे कोटींचा महसूल गोळा केला होता. तर 2022-23 या आर्थिक वर्षांत या विभागाने 1 हजार कोटींचे उदिष्ट ठेवले आहे. हे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने जप्ती मोहीमेसह, थकबाकीदारांचे नळजोड तोडण्याची मोहीम राबविली जात आहे. या विभागाने आतापर्यंत पावणेसहाशे कोटी रूपयांची वसुली केली आहे. एकीकडे कर संकलन विभागाचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत असताना पाणी पुरवठा विभागाकडून म्हणावी तशी पाणीपट्टी वसुली होत नाही. 2019-2020 मध्ये 42 कोटी 94 लाख 23 हजार, 2020-2021 मध्ये 41 कोटी 86 लाख 26 हजार, 2021-2022 मध्ये 54 कोटी 98 लाख 89 हजार तर 2022-23 या चालू आर्थिक वर्षांतील 16 जानेवारीअखेर 40 कोटी 79 लाख 73 हजार रूपयांची वसुली झालेली आहे. तर पाणी पुरवठा विभागाची नळजोडधारकांकडे 81 कोटी 91 लाख 79 हजार रूपयांची थकबाकी आहे.

राज्यातील काही महापालिकांमध्ये पाणीपट्टी वसुली आणि कर वसुलीचे एकत्रित कामकाज चालते. त्या महापालिकांचा पिंपरी पालिका प्रशासन अभ्यास करत आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडे दोन वेळा बैठकाही झाल्या आहेत. मात्र, सामूहिक सोसायटी मीटर, विना मीटर, व्यक्तीगत असा पाणी मीटर देण्याचा प्रकार आहे. यामध्ये काहींचे मीटर रिडींग हे तिमाही, सहामाही, वार्षिक असे घेतले जाते. त्यामुळे मालमत्तांशी नळजोड जोडणे तांत्रिकदृष्ट्या कठीण वाटत असल्याने अधिकारी सांगत आहेत.

पाणीपट्टी वसुली ही कर आकारणी व कर संकलन विभागाशी जोडण्यासाठी पालिकेने पाऊले उचलली आहेत. याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत आहे. राज्यातील ज्या पालिकांमध्ये पाणीपट्टी वसुली व कर वसुली एकत्रीकरण सुरू आहे, त्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. मात्र, आगामी वर्षांपासून याची अंमलबाजवणी सुरू होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले

जमिनीच्या 108 फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक
पुणे, दि. १९ (पीसीबी) – पुणे मेट्रोच्या PCMC ते स्वारगेट (17 किमी) आणि वनाझ ते रामवाडी (16 किमी) अश्या दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकामधे PCMC ते स्वारगेट मार्गिकेवरील भूमिगत स्थानक आणि वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवरील उन्नत स्थानक आहे. भूमिगत स्थानक ते उन्नत स्थानक यांना एस्किलेटर आणि लिफ्ट यांनी जोडले आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची खोली 33.1 मीटर (108.59 फूट) असून हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानक आहे.

या भूमिगत स्थानकाचे आजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत 95 फूट उंच असून तेथे थेट सूर्यप्रकाश वा नैसर्गिक प्रकाश पडेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. असे वौशिष्ठ असणारे हे एकमेव भूमिगत मेट्रो स्थानक आहे. या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाला डेंगळे पूल, कामगार पुतळा आणि पुणे जिल्हा न्यायालय या बाजूंनी प्रवाश्याना येण्या-जाण्यासाठी पादचारी वा वाहतुकीचे प्रावधान करण्यात आले आहे. सिव्हिल कोर्ट ते हिंजेवाडी हि पुण्यात बांधण्यात येणारी तिसरी मेट्रो मार्गिका पादचारी पुलाने या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक हे मेट्रो झाल्याचे मध्यवर्ती स्थानक म्हणून नावारूपाला येईल. त्यामुळे या स्थानकात 8 लिफ्ट आणि 18 एस्किलेटर प्रवाश्यांसाठी बसविण्यात येत आहेत.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर 11.17 एकर असून या स्थानकाला येण्या-जाण्यासाठी एकूण 7 दरवाजे लावण्यात येणार आहेत. या स्थानकात मोठ्याप्रमाणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ड्रॉप अँड गो साठी एक स्पेशल लेन असणार आहे. मल्टी मोडल इंटिग्रेशन साठी PMPML चा थांबा असणार आहे. या संपूर्ण परिसराचे लँडस्केप अत्यंत आकर्षक असे करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कारंजी, विविध झाडे, हरित पट्टे, आकर्षक झाडी मोठ्याप्रमाणावर लावण्यात येणार आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी मेट्रो भवनचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण पुणे मेट्रोचे प्रशासन या मेट्रो भवन येथील कार्यालयांतून होईल. मेट्रो भवनची इमारत IGBC प्लॅटिनम मानांकनानुसार बांधण्यात येणार असून मेट्रो भवनाच्या फसाटवर मोठ्याप्रमाणात झाडे लावण्यात येणार आहेत. येत्या दोन महिन्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि PCMC ते सिव्हिल कोर्ट या मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नुकतेच या दोन्ही मार्गांवर चाचणी घेण्यात आली आहे. हे मार्ग प्रवाश्यांसाठी खुले झाल्यावर पुणे व पिंपरी चिंचवड हि जुळी शहरे मेट्रोसारख्या मास ट्रान्झिट वाहतूक व्यवस्थे ने जोडली जाणार आहेत.

त्यामुळे येथील प्रवाश्यांच्या वेळेची मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. PCMC ते वनाझ या 22 किमीचा प्रवास केवळ 31 मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. यामुले चाकरमानी, महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्या वेळेची मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. मेट्रोने पर्यावरण पूरक, जलद, सुरक्षित, ऑल वेदर असा पर्याय पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना दिला आहे.