सिद्धरामय्या – Pimpri Chinchwad Bulletin https://pcbtoday.in Sat, 25 Aug 2018 07:52:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.2.5 मी पुन्हा एकदा कर्नाटकचा मुख्यमंत्री  होईन – सिद्धरामय्या https://pcbtoday.in/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%9a%e0%a4%be/ Sat, 25 Aug 2018 07:52:37 +0000 https://pcbtoday.in/?p=9224 बंगळुरू, दि. २५ (पीसीबी) – राज्यातील जनतेच्या आशिर्वादाने मी पुन्हा एकदा कर्नाटकचा  मुख्यमंत्री  होईन, असा आशावाद माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे. मला दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद मिळू नये यासाठी विरोधकांनी हातमिळवणी केली. सध्याच्या राजकारणात जातीचा आणि पैशाचा मोठया प्रमाणावर वापर केला जात  आहे, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.  

हसन येथे एका मेळाव्यात सिद्धरामय्या बोलत होते.

लोक मला पुन्हा एकदा आशिर्वाद देऊन राज्याचा मुख्यमंत्री बनवतील, असे मला वाटले होते. पण मी दुर्देवाने हरलो. पराभवानंतर सर्व काही संपलेले नाही. राजकारणात जय-पराजय सुरु असतो. मी पुन्हा कर्नाटकचा मुख्यमंत्री होईन, असे सिद्धरामय्या म्हणाले.

दरम्यान, कर्नाटकात काँग्रेसच्या तुलनेत जेडीएसकडे निम्मे आमदार असून एच.डी.कुमारस्वामी कर्नाटकाचे मुख्यमंत्री  झाले आहेत. केवळ भाजपाला आणखी एका राज्यात सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने अशा प्रकारची  तडजोड केली आहे. काँग्रेस आणि जेडीएसमध्ये सर्वकाही आलबेल नाही. सरकारमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद आहेत.

 

 

 

 

 

]]>