विक्रम – Pimpri Chinchwad Bulletin https://pcbtoday.in Tue, 04 Dec 2018 14:50:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.2.5 देवेंद्र फडणवीस यांनी केला विक्रम; विलासराव देशमुखांपेक्षा जास्त काळ राहिले मुख्यमंत्रीपदावर    https://pcbtoday.in/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%87/ Tue, 04 Dec 2018 14:50:25 +0000 https://pcbtoday.in/?p=21834 मुंबई, दि. ४ (पीसीबी) – राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी मिळवला. हा मान मिळवणारे ते दुसरे मुख्यमंत्री  ठरले आहेत. या आधी काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावावर हा विक्रम होता. आज (मंगळवार)  मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला. विलासराव देशमुख यांच्या सलग दिवस मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा विक्रम आता फडणवीस यांनी  मोडला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ या पदावर विराजमान होण्याचा मान वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर यापूर्वी विलासरावांचे नाव होते. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मागे टाकून दुसऱ्या स्थानावर आज (४ डिसेंबर २०१८) झेप घेतली.

मुख्यमंत्री सलग कार्यकाळ कालावधी –

१) वसंतराव नाईक – ११ वर्षे २ महिने १५ दिवस (५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७२)

२)देवेंद्र फडणवीस-    ४ वर्षे १ महिना ४ दिवस   ( ३१ ऑक्टोबर २०१४ पासून आजपर्यंत)

३) विलासराव देशमुख-   ४ वर्षे १ महिना ३ दिवस  (१ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८)

वसंतराव नाईक हे सलग ११ वर्षे दोन महिने आणि पाच दिवस (एकूण ४०९७ दिवस) मुख्यमंत्रिपदावर विराजमान  होते. विलासराव देशमुख हे पहिल्यांदा १८ ऑक्टोबर १९९९ रोजी मुख्यमंत्री झाले. त्यांना पहिल्या कारकिर्दीत ११८७ दिवस (१६ जानेवारी २००३ पर्यंत) मिळाले. ते दुसऱ्यांदा एक नोव्हेंबर २००४ रोजी मुख्यमंत्री झाले. ही कारकिर्द त्यांची अधिक दीर्घ म्हणजे १४९४ दिवसांची ठरली. फडणवीस यांनी विलासरावांच्या सलग १४९४ दिवसांचा विक्रम मोडीत काढून सलग या दिवसापुढेही आपली कारकिर्द आजपासून पुढे कायम ठेवली आहे.

वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ म्हणजे ४०९७ दिवस मुख्यमंत्री होते. त्यानंतर विलासराव यांची कारकिर्द आहे. त्यांचे दोन टर्ममधील मुख्यमंत्रिपदाचे दिवस २५८१ आहेत. शरद पवार हे  चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांचा एकूण कार्यकाल हा २४१३ दिवसांचा आहे.

पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण हे एक ९३३ दिवस (१ मे १९६२ ते १९ नोव्हेंबर १९६२) कार्यरत होते. इतर मुख्यमंत्र्यांचा कालावधी खालीलप्रमाणे –

मारोतराव कन्नमवार- ३७० दिवस

शंकरराव चव्हाण (दोन टर्म १६५३ दिवस)

वसंतदादा पाटील (दोन टर्म-१२७८ दिवस)

शरद पवार (चार टर्म २४१३ दिवस)

ए. आऱ. अंतुले- (५८३ दिवस)

बाबासाहेब भोसले (३७७ दिवस)

शिवाजीराव पाटील निलंगेकर (२७७ दिवस)

सुधाकरराव नाईक- (६०८ दिवस)

मनोहर जोशी (१४१९ दिवस)

नारायण राणे (२५९ दिवस)

विलासराव देशमुख (दोन टर्म २६८१ दिवस)

सुशीलकुमार शिंदे (६५१ दिवस)

अशोक चव्हाण (दोन टर्म ६७९ दिवस)

पृथ्वीराज चव्हाण (१४१५ दिवस)

पी. के. सावंत हे २५ नोव्हेंबर १९६३ ते चार डिसेंबर १९६३ असे दहा दिवस हंगामी मुख्यमंत्री होते.

 

 

]]>
प्रसिद्ध अभिनेते विक्रम यांच्या मुलाला अटक https://pcbtoday.in/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-2/ Mon, 13 Aug 2018 06:46:36 +0000 https://pcbtoday.in/?p=7382 चेन्नई, दि. १३ (पीसीबी) – तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विक्रम यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. विक्रम यांचा मुलगा ध्रुव चालवत असलेली गाडी रिक्षावर धडकून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.

]]>
प्रसिद्ध अभिनेते विक्रम यांच्या मुलाला अटक https://pcbtoday.in/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae/ Mon, 13 Aug 2018 06:34:27 +0000 https://pcbtoday.in/?p=7376 चेन्नई, दि. १३ (पीसीबी) – तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विक्रम यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. विक्रम यांचा मुलगा ध्रुव चालवत असलेली गाडी रिक्षावर धडकून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.

निष्काळजीपणे गाडी चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी ध्रुव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र वैयक्तिक जातमुचलक्यावर ध्रुवची नंतर सुटका करण्यात आली.

चेन्नईतील टीटीके मार्गावर रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षाचालक कमेशवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. अपघातात रिक्षाचाही चक्काचूर झाला. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत, मात्र ध्रुवने मद्यपान केले नसल्याचे पोलिसांनी सांगितलं. अपघातावेळी त्याच्यासोबत गाडीत आणखी दोघे जण होते.

]]>