राष्ट्रवादी – Pimpri Chinchwad Bulletin

आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट – अजित पवार
रायगड, दि. ३ (पीसीबी) : तीन राज्यात भाजपने सत्ता खेचली आहे. तेलंगणा एबीव्हीपीचा कार्यकर्ता काँग्रेसने खेचला अन्यथा तेलंगणाचं चित्रही वेगळं दिसलं असते. आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झालं, भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा चेहरा नरेंद्र मोदी हेच त्रिवार सत्य आहे, असे देखील अजित पवार या वेळी म्हणाले,

अजित पवार म्हणाले, मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोंदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं ठरलं नाही. जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. ईव्हीएम घोटाळा एकाला शक्य नाही.

काहीजण दिशाभूल करण्याचे काम करत आहेत :अजित पवार
कर्जतमध्ये दोन दिवसाचं शिबिर घेतलं. त्यावर वरिष्ठांनी काही प्रतिक्रिया दिली. मी अनेक वर्ष सत्तेत आहे. मला खोट बोलत येतं नाही. काहीजण दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनां प्रतिनिधी केलं आहे. आम्ही काही चांगलं करत आहोत. यासाठी नरेंद्र मोदी अमित शाह यांची मदत घेऊन महाराष्ट्राला एक नंबर करण्याच काम करत आहोत, असे अजत पवार म्हणाले.

गावबंदी आंदोलन ही महाराष्ट्राची संस्कृती नाही :अजित पवार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय पुढाऱ्यांना अनेक ठिकाणी गावबंदी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, काहीजण लगेचच आरक्षण द्या अन्यथा मुंबईकडे येऊ म्हणत आहेत. परंतु टिकणारे आरक्षण देण्याच काम सुरू आहे. काहीजण गावबंदी आंदोलन करत आहेत त्यांना सांगणं आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं करू नये.

अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा
अजित पवरांनी यावेळी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, काहींनी आशीर्वाद द्यायला पाहिजेत परंतु ते थांबायला तयार नाहीत त्यामुळे आम्ही बहुमताने निर्णय घेतला आहे. तीन राज्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात देखील लोकसभा जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार अहोत. 48 पैकी 45 जागा आम्ही निवडून आणणार आहोत.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘शहर सरचिटणीस’पदी जयंत शिंदे
पिंपरी,दि.०३(पीसीबी) – जयंत शिंदे यांची पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘शहर सरचिटणीस’पदी निवड झाली. पिंपरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर मा.आझमभाई पानसरे आणि शहराध्यक्ष मा.तुषार कामठे आदी मान्यवर उपस्थित होते. जयंत शिंदे हे पेशाने ब्रँड कन्सल्टंट असून, कॉर्पोरेट,कल्चरल आणि पोलिटिकल ब्रँडिंगच्या क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आह. ‘ब्रँड सायन्स’चे जाणकार असलेल्या जयंत शिंदे यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितच फायदा होईल. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

जनता लयं अवघड; विचार करून मतदान करते – जयंत पाटील
पिंपरी चिंचवड शहराच्या अर्थकारणाला शरद पवारांमुळे चालना कार्यकर्ता मेळाव्यात अमोल कोल्हेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – राष्ट्रवादी पक्षातून गेलेल्यांची चिंता करण्यापेक्षा सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे योग्य संघटन करून पुन्हा नव्या जोमाने काम करत पक्षाची मजबूत बांधणी करायची आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ज्या सुधारणा झाल्या त्यामध्ये शरद पवारांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील जनता लय अवघड आहे; लोक विचार करून मतदान करतात. येत्या निवडणुकीत जनता महायुतीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते शनिवारी (२ डिसेंबर) करण्यात आले. तसेच यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी माजी आमदार आणि राष्ट्रीय सचिव पदी नियुक्त झालेले ॲड. जयदेव गायकवाड, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर सुमनताई पवळे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत – धर, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, मीना नानेकर, शकुंतला भाट, स्मिता कुलकर्णी, मधुकर चिंचवडे, प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब शेख, ज्येष्ठ नेते श्याम वाल्हेकर, प्रकाश म्हस्के, निहाल पानसरे, ज्योती निंबाळकर, इम्रान शेख, ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे, शिरीष जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांचे समाजकारण म्हणजे बहुजन समाजाला प्रगतीकडे घेऊन जाणे आणि हेच कार्य राजकीय सामाजिक भावनेतून शरद पवार करत आहेत. जे सोडून गेले त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. परंतु जनतेबरोबर राहिले तर सत्ता सत्ता येते. शरद पवारांनी दहा वेळा अशी किमया करून दाखवलेली आहे. राज्याची विस्कटलेली घडी पवार साहेबच पुर्ववत करू शकतात, असा विश्वास जनतेला आहे. म्हणूनच जनता शरद पवारांच्या मागे ठामपणे उभी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लवकरच निवडणुका होत असून नवा डाव सुरू होत आहे. कारण पूर्वीच्यांची मुदत आता संपलेली आहे. येत्या काळात महापालिका तसेच राज्यात राष्ट्रवादीची पर्यायाने महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, रस्ते मोठे केले म्हणजे विकास होत नाही. विविध कंपन्या, माहिती तंत्रज्ञाननगरी आणत शहराच्या अर्थकारणाला शरद पवार यांनी चालना दिली. सत्ताधाऱ्यांनो नदी सुधार प्रकल्पाचे काय झाले. इंद्रायणीमाईवर फेसाचा तवंग येत आहे, असे प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केले. वारकऱ्यांना कशाला नमन करायचे. भौतिक सुखाची नाही तर आपल्याला तत्वांची लढाई लढाईची आहे, असे खा. डॉ. कोल्हे यांनी सांगितले. स्वागत प्रास्ताविक करताना तुषार कामठे म्हणाले की,पिंपरीत नवीन सुरू झालेल्या पक्ष कार्यालय मध्ये ई सुविधा केंद्रद्वारे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मदत केली जाईल. येथे महिला व युवतींसाठी स्वतंत्र कक्ष असून याद्यावत कार्यालयात भविष्यात नागरिकांना कोणते कामानिमित्त हेलपाटे मारावे लागणार नाहीत. शहराचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे आज पवार साहेबांबरोबर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असा विश्वास तुषार कामठे यांनी व्यक्त केला. आभार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी मानले. यावेळी ॲड. जयदेव गायकवाड, प्रशांत जगताप, महेबुब शेख यांनी मनोगत व्यक्त केले.

ज्या शक्तीने शिवसेनेचे नाव, चिन्ह हिसकावले त्यांना जनता धडा शिकवेल – शरद पवार
चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – चिन्हासकट संबंध पक्ष काढून घेतला आणि आणखी कोणाला दिला हे कधी देशात घडले नव्हते. पण, शिवसेनेबाबत जे घडले. त्याच्या पाठीमागे कुठली तरी मोठी शक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, हे ज्यांनी केले आहे. त्यांना लोक धडा शिकवतील, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

पिंपळेसौदागर येथे बोलताना पवार म्हणाले, सत्तेचा गैरवापर करुन एखादा राजकीय पक्ष, त्याची खून (चिन्ह) या सगळ्याच गोष्टी कोणी हिसकावून घेते किंवा पळवते हे या देशात कधी घडले नव्हते. शिवसेनेचे नाव, चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय नियमांना धरुन झाला नाही. निर्णय कोण घेतेय याची आम्हाला शंका येत आहे. आयोग निर्णय घेतोय की आयोगाला कोणाचे मार्गदर्शन आहे.

अनेक पक्षामध्ये अंतर पडले. काँग्रेस आय आणि काँग्रेस एस असे दोन पक्ष झाले होते. काँग्रेस एसचा मी अध्यक्ष होतो. काँग्रेस आयच्या प्रमुख इंदिरा गांधी होत्या. त्यावेळेला काँग्रेस नाव वापरण्याचा मला अधिकार होता. नाव काढून घेतले नाही. त्याला निवडणूक आयोगाने कधी अडविले नाही. शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाचे वैशिष्ट्ये असे आहे की पक्षाचे नाव, खून हे सगळे दुस-याला दिले. असा निर्णय आजपर्यंत या देशाच्या इतिहासात कधी घडला नाही.

पण, मला लोकांचा अनुभव आहे. ज्यावेळेला सत्तेचा अतिगैरवापर होतो. एखाद्या पक्षाला, नेतृत्वाला नाऊउमेद करण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळेला लोक त्या पक्षाच्या मागे उभा राहतात. मला 100 टक्के खात्री आहे. लोकांशी बोलताना असे दिसते की नेते शिवसेना सोडून गेले. पण, कट्टर शिवसैनिक 100 टक्के उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. हे ठिकठिकाणी दिसते. त्याची प्रचिती आगामी काळत येणा-या निवडणुकीत कळेल, असेही पवार म्हणाले. पक्षात फुटी झाल्या. काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा फुटी झाल्या. पण, चिन्हासकट संबंध पक्ष काढून घेतला आणि आणखी कोणाला दिला हे कधी घडले नव्हते.

पहाटेच्या शपथविधीमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले – शरद पवार
चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – पहाटे सरकार बनविण्याचा प्रयत्नाचा एकचा फायदा झाला तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली. असे काही घडले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का, राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? राष्ट्रपती राजवट उठल्यानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. मी जे सांगितले ते समजणा-यांना समजते असे सूचक विधानही त्यांनी केले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी पवार चिंचवडमध्ये आले होते. पिंपळेसौदागर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार निलेश लंके, अतुल बेनके, अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले उपस्थित होते.

सहसा मी पोटनिवडणुकीतील प्रचाराला जात नसतो. पण, एकेकाळी मला देशाच्या संसदेत पाठविण्यास या मतदारसंघाने हातभार लावला आहे. महाविकास आघाडी एकत्रित काम करत आहे. सहज चक्कर ठाकण्यासाठी मी आलो आहे. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असलो. तरी, मी या जिल्ह्यातील आहे. येथून चारवेळा निवडून गेलो. लोकांशी माझे संबंध आहेत. भेटीगाठी होतात. यासाठी मी आलो आहे, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ शिवसैनिक तारामल कलाटे (अण्णा) यांचा नाना काटे यांना पाठिंबा
– वाकड, ताथवडे, पूनावळे प्रभागातून ५ हजाराचे लीड देणार

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाच्या कुटनीतीमुळे शिवसैनिक प्रचंड दुखावला आहे. खोके सरकारच्या मदतीने शिवसैनिकात फूट पाडणाऱ्या भाजपचा चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वचपा काढण्याची संधी चालून आली आहे. यावेळी आमचा पक्ष हा महाविकास आघाडीचा उमेदवार असणार आहिज मत वाकड येथील ज्येष्ठ शिवसैनिक तारामल कलाटे (आण्णा) यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे पुनावळे, ताथवडे आणि आमच्या हक्काच्या वाकड परिसरातून महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना ५ हजारापेक्षा जास्त मताचे लीड देणार असेही कलाटे यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती स्व. नगरसेवक आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची होती. यावेळी चिंचवडची निवडणूक ही भावनिकतेवर नव्हे तर विकासकामांच्या जोरावर जिंकू असा विश्वासही रोहित पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

भ्रष्ट कारभाराला कंटाळून भाजपच्या चिंचवड विधानसभेतील तीन विद्यमान आणि एक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे चिंचवड विधानसभेत खळबळ निर्माण झाली असून भाजप बॅकफूटवर गेला आहे. भाजपला साथ देणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रचाराला आणि मतदानाला बोलावणाऱ्या स्वार्थी आणि भ्रष्ट भाजप नेत्यांनीच भावनेचा बाजार मांडल्याने मत तारामल कलाटे (अण्णा) यांनी पुनावळे येथील कोपरा सभेवेळी दिले.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, स्व. नगरसेवक आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, मयूर कलाटे, रेखा दर्शीले, संदीप पवार, सुप्रिया पवार, विजय दर्शिले, माजी सरपंच लक्ष्मण मोहिते, संभाजी शिंदे, सागर ओव्हाळ, राजाराम काटे, प्रकाश काटे, सुरेश रानवडे, किरण बोरगे, सुभाष कोयते, शिवाजी बांदल, अतुल काटे, सचिन झिंजुर्डे, राहुल काटे, ईश्वर ओव्हाळ, राजेंद्र गायकवाड, शांताराम बोडके, बाळासाहेब बोडके, अक्षय भुजबळ, श्रीकांत ढवळे, सुनील ढवळे यांच्यासह पुनावळेतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

पुनावळे येथील बुद्ध विहार, बोरगेवाडा, भैरवनाथ मंदिर, पुणे शहर सावता माळी मंदिर ते मोहिते कॉम्प्लेक्स पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर कोयतेवस्ती, पांढरे वस्ती, काटे वस्ती, ताजणे वस्ती, विजयनगर, माळवाडी या परिसरात रॅली काढून शिवसेनेच्या नगरसेविका रेखा दर्शीले यांच्या निवासस्थानी जनतेशी संवाद साधला.

चिंचवडमध्ये रावसाहेब दानवेंसह जयंत पाटील, भास्कर जाधव, धनंजय मुंडे
चिंचवड, दि. २० (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक सध्या प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपा आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने आपला उमेदवार मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी प्रयत्न करत आहेत.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपाकडून रावसाहेब दानवे हे कोपरा येथे सभा घेणार आहेत तर नाना काटेंसाठी राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भास्कर जाधव, धनंजय मुंडे आणि रोहित पाटील यांची सभा आयोजित केली आहे. चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे नाना उर्फ विठ्ठल काटे अशीच लढत पाहायला मिळत आहे. चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना भाजपा आणि महाविकास आघाडीकडून प्रचार करण्यावर जोर दिला जात आहे. अनेक मातब्बर आणि दिगग्ज नेते चिंचवड मतदारसंघात दिसत आहेत. दोन्ही पक्षासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार हे नाना काटे यांच्यासाठी ठाण मांडून असून त्यांचे विशेष लक्ष या पोटनिवडणुकीवर आहे.

नुकत्याच झालेल्या सभेत त्यांनी स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या भाजपाला हद्दपार करा असे आवाहन जनतेला केले. अजित पवारांनी अपक्ष असलेल्या उमेदवाराचे नाव घेणे देखील टाळले. तर, भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रचार सभा घेतल्या. महाराष्ट्राची वाघीण चिंचवडच्या वाघिणीसाठी आली असून अश्विनी जगताप यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले होते. हे सर्व वातावरण पाहता पुढील दोन दिवस दोन्ही पक्षासाठी महत्वाचे ठरणार आहेत. चिंचवड मतदारसंघात भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांच्यातच लढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार की, आणखी कोणी बघावे लागणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

राज्याचा मंत्रिमंडळ अजित पवार यांच्यामुळेच होत नाहीये
सोलापूर, दि. १३ (पीसीबी) – संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहे. विरोधकांकडूनही वारंवार विस्ताराबाबत बडे दावे करण्यात येत आहेत. अशातच माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी मोठं वक्तव्य केलंय. राज्याचा मंत्रिमंडळ अजित पवार यांच्यामुळेच होत नाहीये, असं उपरोधिक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही… असं खोचक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

सात महिने झाले तरी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, यावरून अजित पवार यांनी एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, पण इथे सरकारला सात महिने झाले तरी विस्तार होत नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी अजित पवार यांनाच कारणीभूत ठरवलं. ते म्हणाले, अजित पवार यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा टोला त्यांनी लगावला.

‘शरद पवार हे ओसाड गावचे पाटील’

अजित पवारांना टोला लगावतानाच सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानींचं कौतुक करण्यात आलंय. यावरून सदाभाऊ खोत म्हणाले, पवार साहेबांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं झालंय. ते ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही. त्यामुळे ते बोलू शकतात, बोलणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे.

आमदार जगताप आणि मुक्ता टिळक आजारी असतानाही भाजपने स्वार्थीपणा केला
चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – चिंचवड पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आघाडीचा मेळावा चिंचवडला आज झाला. यावेळी अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. चिंचवड आणि कसबापेठचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना त्यांची प्रकृती गंभीर असताना रुग्णवाहिकेतून मुंबईला विधानपरिषद आणि राज्यसभेची निवडणूक जिंकण्याकरिता मतदानासाठी नेल्याबद्दल त्यांनी भाजपवर आसूड ओढला. दरम्यान, अजितदादांच्या या खरमरीत टीकेमुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून भाजपचे नेते संतापले आहेत.

चिंचवडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या चिंचवड येथील मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे,या पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आऱपीआयचे (गवई गट)डॉ. राजेंद्र गवई,चिंचवड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे निरीक्षक व पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे,कॉंग्रसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम,शिवसेनेचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले आदी व्यासपीठावर होते.

बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जोडीने भाजपवरही अजित पवार यांनी ३५ मिनिटांच्या आपल्या भाषणात कडाडून टीका केली. जीवघेण्या आजाराशी झुंज देत असलेले आ. जगताप आणि टिळक यांना विधानपरिषद,राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी पु्ण्याहून मुंबईला रुग्णवाहिकेतून नेऊन भाजपने स्वार्थीपणा केला,असा हल्लाबोल यावेळी केला.त्यांना ही दगदग सहन होत नव्हती,पण ते पक्षासाठी गप्प राहिले. पण,पक्षापेक्षा जीव महत्वाचा आहे, हे या दोन्ही आमदारांना भाजपने सांगायला पाहिजे होते, असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवडमध्येही २०१७ पर्यंत भाजप दोन-तीन नगरसेवकांपुरता मर्यादित होता, मात्र, फोडाफोडीच्या त्यांच्या देशभरातील राजकारणामुळे ते इथेही सत्तेत आले, असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्रात भाजप ही शिवसेनेमुळे वाढली. त्यांच्याशी असलेल्या युतीतून ती ग्रामीण भागात पोचली आणि आता तिनेच या शिवसेनेला दूर केल्याची खंत पवारांनी व्यक्त केली.

चिंचवडमध्ये आघाडीत (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) झालेल्या बंडखोरीचा संदर्भ देत अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतही ती औरंगाबादमध्ये झाल्याचा किस्सा यावेळी सांगितला. या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात आघाडीत (राष्ट्रवादी) बंडखोरी झाली.चिंचवडप्रमाणे त्या बंडखोराचीही समजूत काढण्याचा प्रयत्न मी वगळता सर्वांनी केला. कारण मला समजून सांगता येत नाही,असे ते म्हणताच उपस्थितांत हशा पिकला. बरं झालं मी या बंडखोराला फोन करूनही तो लागला नाही,असे ते पुढे म्हणताच आणखी हशा झाला.चिंचवडप्रमाणे औरंबादमध्येही बंडखोराने माघार घेतली नाही.पण,त्याची परिणती त्याला अवघी चारशे मते मिळण्यात झाला, असे सांगत चिंचवडमधील बंडखोराचीही अशीच गत होणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

हिंदुत्वाला लाथ मारून काँग्रेस व राष्ट्रवादीचा विचार स्वीकारीत भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून युती तोडली
मुंबई, दि. १३ (पीसीबी) – भाजप-सेना युती बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस या सर्वांनी टिकवली. पण, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला लाथ मारून काँग्रेस व राष्ट्रवादीचा विचार स्वीकारीत भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून युती तोडली. उद्धव ठाकरे यांचा स्वार्थ आणि पूत्रप्रेम हेच युती तोडण्यास जबाबदार आहे.

युती तोडली नसली तर बरे झाले असते असे आता उद्धव ठाकरे यांना वाटते. त्यांना त्यांची चूक लक्षात आली आहे. पण आता चूक सांगता येत नाही. सावरकर यांचा अपमान होत असताना सरकार जाईल म्हणून तोंडाला पट्टी बांधली. आता हिंदुत्ववावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही, असे बावनकुळे यांनी ठणकावले. निवडणुका या लागणारच आहे. 2024 च्या लोकसभा विधानसभा निवडणुका होणारच आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर इतर निवडणुका लागणार आहे. आम्ही निवडणुकांना घाबरत नाही. निवडणुका लागतील त्यावेळी मोदींच्या नेतृत्वात निवडणुका लढवू. उद्धव ठाकरे यांच्या गरळ ओकण्याला जनता धडा शिकवेल. केव्हाही निवडणुका होऊ द्या आम्ही तयार आहो असे ते बावनकुळे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या जवळचे 50 आमदार निघून गेले. त्यांना अल्पमतातील सरकार टिकवण्यासाठी राज्यपालांची साथ हवी होती. राज्यपालांनी संवैधानिक पद्धतीने सरकार स्थापन केले. ठाकरे सरकारच्या नियमबाह्य कामांना चाप लावण्याचे काम राज्यपालांनी केले. म्हणून ते डोळ्यात खूपत होते. अनेक अटी व शर्ती घालून अनिल देशमुख यांना फक्त जामीन मिळाला आहे. त्यांना क्लिनचीट मिळालेली नाही. न्यायालयात अजूनही खटला सुरू आहे. अनिल देशमुख यांनी जल्लोष करीत शक्तिप्रदर्शन केले. पण जनतेच्या न्यायालयात तसेच न्यायालयातही ते आरोपी आहे. जल्लोष करून त्यांनी खूप काही मिळवले असे नाही.

नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले नसते तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले असते असे शिवसेना व काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. तर नाना पटोले मात्र राज्यपालांवर आरोप करीत आहेत. पटोले यांनी पहिले राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या नेत्याला खरे काय ते विचारावे असे बावनकुळे म्हणाले. बोहरा समाजाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लहानपणापासून प्रेम आहे. गुजरात प्रवासामध्ये बोहरा समाजासोबत त्यांनी वेळ घालवला आहे. मुस्लिमांना भेटल्यामुळे हिंदुत्व जात नाही. तर हिंदुत्वावर आक्रमण झाल्यावर चूप राहिले तेव्हा हिंदुत्व जाते. मुस्लिम समाजाला सोबत ठेवण्यात आक्षेप नाही. काहीही बोलायला न राहिल्याने सकाळपासून भोंगा सुरू होतो.