ठाकरे गट – Pimpri Chinchwad Bulletin https://pcbtoday.in Tue, 17 Jan 2023 12:25:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.2.5 कपिल सिब्बल यांनी केली शिंदे गटाची कोंडी https://pcbtoday.in/%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%ac%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf/ Tue, 17 Jan 2023 12:25:24 +0000 https://pcbtoday.in/?p=148204 खरी शिवसेना कुणाची, आता पुढची सुनावणी २० जानेवारीला

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : खरी शिवसेना कुणाची यावर आज (ता. 17) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यानंतर आता शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी युक्तीवाद केला. त्यावर पुन्हा सिब्बल यांनी बाजू मांडली. आता निवडणूक आयोगात पुढील सुनावणी शुक्रवारी 20 जानेवारीला होणार आहे.

कपिल सिब्बल यांनी बाजू माडतांना म्हटले होते, ”त्यांनी शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. शिवसेनेतील हा फुटीर गट नाही. शिंदे गटाला काही अर्थ नाही. खरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचीच आहे. शिवसेनेत फूट हे कपोकल्पीत काल्पनिक बाब असल्याचे सिब्बल म्हणाले. शिंदे गट हे वास्तव नाही, शिवसेनेच्या घटनेचे आयोगात वाचन करण्यात आले. फूटलेल्या आमदारांनी स्वतःहून पक्ष सोडला,” असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाच्या कागद पत्रांमध्ये अनेक त्रूटी आहेत. शिंदे गटाच्या याचीकेमध्ये अनेक त्रूटी आहेत, शिंदे गटाचे बंड पक्षाच्या आवस्थेवर परिनाम करणारे नाही. चिन्हावर निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करु नये, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे मुद्दे ठाकरे गटाने खोडून काढले. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा सिब्बल यांचा दावा. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नये. काही लोकांना पक्षातून घेऊन बाहेर पडणे हे बेकायदेशीर, असल्याचेही सिब्बल म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्या. सर्व कागदपत्रांची छाननी करावी, असा युक्तीवाद सिब्बल यांच्या बाजूने सुरु आहे.

]]>