उद्धव ठाकरे – Pimpri Chinchwad Bulletin

कलाटे यांच्या विरोधात आता शिवसेनेचा कारवाईचा बडगा, हकालपट्टी कऱणार
चिंचवड, दि. ११ (पीसीबी) : चिंचवड पोटनिवडणुकित शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हेच सद्या प्रचाराचा केंद्रबिंदू राहिले आहेत. भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे या उमेदवारांवरचा फोकस कलाटे यांच्यावर गेली आठवडाभर कायम राहिल्याने त्यांच्या उमेदवारीमुळेच आता चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, महाआघाडीत फूट पडल्याच्या बातम्या सुरु झाल्याने आता शिवसेनेने कलाटे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर पक्ष एक,दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे या पक्षाचे उपनेते आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी सांगितले आहे.

त्याअगोदर दुपारी `सरकारनामा`ने पक्षादेश न पाळल्याने कलाटेंवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाल्याची बातमी व्हायरल केली होती. ती काही तासांतच खरी ठरली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत मनधरणी करूनही काल दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत कलाटे यांनी आपली उमेदवारी मागे न घेतल्याने तातडीने सायंकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

त्यानंतर अहिर यांनी बंडखोर कलाटेंवर कारवाई होणार असल्याचे सांगितले.पक्षाशी त्यांचा सबंध राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांना साथ देणाऱ्या नगरसेवकांवर,मात्र लगेच कारवाई न करता ती खातरजमा करून केली जाईल,असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाईल.त्यानंतरही त्यांनी कलाटेंना साथ दिली, तर आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत त्यांना तिकिट दिले जाणार नाही,असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान,चिंचवडची निवडणूक ही भाजप विरुद्ध आघाडी अशी दुरंगी होणार असून येथे विजयाचा आम्हाला आत्मविश्वास (कॉन्फीडन्स) आहे.अतिआत्मविश्वास नाही, असे सचिन अहिर म्हणाले. आघाडीच्या उमेदवाराच्या (राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाना काटे) प्रचारार्थ शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा रोड शो चिंचवडला पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच गरज वाटली,तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाची मुलूखमैदान तोफ संजय राऊत यांना सुद्धा चिंचवडच्या प्रचाराला बोलवू,असे ते म्हणाले. गतवेळी २०१९ ला कलाटे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने त्यांना लाखभर मते मिळाली होती. ती त्यांची वैयक्तिक नव्हती, तर पक्षाची होती. ती यावेळी त्यांना मिळणार नाहीत. परिणामी ही लढत भाजप विरुद्ध आघाडी अशीच होईल,असे ते म्हणाले.

आनंद दिघेंच्या जयंती निमित्त टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार का?
मुंबई, दि.२७ (पिसीबी) : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज जयंती असून ठाण्यामध्ये या जयंतीच्या कार्यक्रमावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. टेंभी नाका येथे आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे हे ठाण्यात आरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर ते आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघेंना आदरांजली वाहतील, असे बोलले जात होते. मात्र उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी पाठ फिरवली. त्यामुळे शिंदे गटासहीत ठाण्यातील काही कडवट शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आज आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त आनंद आश्रम येथे ठाकरे गटाचे नेते अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. मात्र शिंदे गटाच्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागू शकतो.

५० खोके घोषणेवरुन ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले

उद्धव ठाकरे यांनी काल आरोग्य शिबिराच्या निमित्ताने राजकीय भाषण करणार नसल्याचे सांगितले होते. मात्र तरिही त्यांनी निष्ठेच्या पंघरुणाखाली लपलेले लांडगे, असे वक्तव्य केले होते. तसेच ‘५० खोके…’ ही घोषणा काश्मीरमध्ये पोहोचली असल्याचेही ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यावर पलटवार करतील अशी शक्यता आहे. आज आनंद आश्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कॅबिनेट मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील आणि आमदार प्रताप सरनाईक अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.

तर ठाकरे गटाकडून खासदार राजन विचारे, केदार दिघे आणि इतर नेते हे आनंद आश्रमात जाणार असल्याचे कळते. मात्र शिंदे गटाकडून त्यांचा विरोध होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच पुढच्या काही दिवसांत ठाण्यात जाहीर सभा घेऊन राजकीय भाष्य करु, असे सुतोवाच केले होते. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आजच ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जाऊ शकते.

उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांची प्रॉपर्टीची चौकशी केली

शिंदे गटाकडून आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. जेव्हा दिघे यांचे निधन झाले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला बोलावून घेतले होते आणि दिघे यांची प्रॉपर्टी किती आहे आणि ती कुणाकुणाच्या नावावर आहे, याची चौकशी केली होती. शिंदे म्हणाले की, मला वाटलं होतं ठाकरे हे दिघेंच्या कामाबाबत बोलतील. त्यांनी पक्ष कसा वाढवला? ठाण्यात आता पुढे कसे काम करायचे? यावर चर्चा होईल. मात्र उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाने मला धक्काच बसला, असा आरोप शिंदे यांनी केला होता.

कपिल सिब्बल यांनी केली शिंदे गटाची कोंडी
खरी शिवसेना कुणाची, आता पुढची सुनावणी २० जानेवारीला

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : खरी शिवसेना कुणाची यावर आज (ता. 17) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यानंतर आता शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी युक्तीवाद केला. त्यावर पुन्हा सिब्बल यांनी बाजू मांडली. आता निवडणूक आयोगात पुढील सुनावणी शुक्रवारी 20 जानेवारीला होणार आहे.

कपिल सिब्बल यांनी बाजू माडतांना म्हटले होते, ”त्यांनी शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. शिवसेनेतील हा फुटीर गट नाही. शिंदे गटाला काही अर्थ नाही. खरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचीच आहे. शिवसेनेत फूट हे कपोकल्पीत काल्पनिक बाब असल्याचे सिब्बल म्हणाले. शिंदे गट हे वास्तव नाही, शिवसेनेच्या घटनेचे आयोगात वाचन करण्यात आले. फूटलेल्या आमदारांनी स्वतःहून पक्ष सोडला,” असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाच्या कागद पत्रांमध्ये अनेक त्रूटी आहेत. शिंदे गटाच्या याचीकेमध्ये अनेक त्रूटी आहेत, शिंदे गटाचे बंड पक्षाच्या आवस्थेवर परिनाम करणारे नाही. चिन्हावर निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करु नये, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे मुद्दे ठाकरे गटाने खोडून काढले. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा सिब्बल यांचा दावा. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नये. काही लोकांना पक्षातून घेऊन बाहेर पडणे हे बेकायदेशीर, असल्याचेही सिब्बल म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्या. सर्व कागदपत्रांची छाननी करावी, असा युक्तीवाद सिब्बल यांच्या बाजूने सुरु आहे.

आता `बाळासाहेबांचा राज` नाटक करणार शिवसेनेतील भाऊबंकीचे प्रदर्शन
मुंबई, दि. १७ (पीसीबी) – शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा यासंदर्भातील महत्त्वाची सुनावणी आज होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे. शिवसेनेच्या याच संघर्षात आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नात्यावर आधारीत भावनिक संवाद असलेलं एक व्यावसायिक नाटक मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. बंडखोरीने पोखरलेल्या शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरु असतानाच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नात्यावरील या नाटकाने आणखी एक नवा ट्विस्ट पहायला मिळण्याची शक्यता आहे. या दोन अंकी नाटकाची उत्सुकता तमाम मराठी प्रेक्षकांना लागली आहे.

येत्या 23 जानेवारी रोजी या बाळासाहेबांचा राज या नाटकाचा शुभारंभ होत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोहोंमध्ये शिवसेनेचा वाद सुरु असतानाच राज ठाकरे यांचे शिवसेना सोडण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कशा प्रकारचे नाते होते, हे सांगणारे नाटक महाराष्ट्रातील जनतेची अधिक उत्कंठा वाढवणारे ठरू शकते.

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भावनिक नात्यावर भाष्य करणारे मराठी नाते लवकरच रंगभूमीवर पदार्पण करत आहे. मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर आधारित नाटकाचा प्रयोग होत आहे. यापूर्वी या व्यक्तिरेखांशी साधर्म्य असलेल्या पात्रांचा हिंदी रंगभूमीवर प्रयोग झाले होते. बाळासाहेबांचा राज या मराठी व्यावसायिक नाटकाचा लवकरच शुभारंभ होत आहे. 23 जानेवारी बाळासाहेबांच्या जन्मदिनी होणार नाटकाचा शुभारंभ होत आहे. अनिकेत बंदरकर नाटकाचे हे या नाटकाचे लेखक-दिगदर्शक आहेत. प्रमोद गांधी निर्माते आणि गणेश कदम यांची प्रमुख निर्मिती आहे. प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी 4 वाजता शुभारंभाचा प्रयोग आहे.

नाटकात बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या व्यक्तिरेखा अत्यंत भावनिक पातळीवर साकारण्यात आल्या आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि पक्षाचे आमदार राजू पाटील यांचे नाटकाला मार्गदर्शन लाभले आहे. मनसे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांचे नाटकाला विशेष सहकार्य लाभले आहे. ठाण्यात काल अविनाश जाधव यांनी केले नाटकाच्या पोस्टरचे अनावरण केले.