अश्विनी जगताप – Pimpri Chinchwad Bulletin

महाराष्ट्राची ही वाघीण चिंचवडची वाघीण अश्विनीताईंसाठी
पिंपरी, दि.20 पीसीबी : मोठ्या संख्येने मराठवाड्यातील मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सभा घेतली. त्यात त्यांनी महाराष्ट्राची ही वाघीण चिंचवडच्या वाघीणीसाठी आल्याचे सांगितले.

चिंचवडचे दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. लक्ष्मणभाऊंच्या निधनामुळे निर्माण झालेली मोठी पोकळी अश्विनीताई भरून काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लक्ष्मणभाऊंचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला अश्विनीताईंना आशिर्वाद द्यायचा आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. मी येथे आले हे सफल झाले पाहिजे, मला मान खाली घालायला लागली नाही पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी `कोण आली रे कोण आली, महाराष्ट्राची वाघीण आली`अशी जोरदार घोषणाबाजी उपस्थितांनी केली. तो धागा पकडून महाराष्ट्राची ही वाघीण चिंचवडची वाघीण अश्विनीताईंसाठी आल्याचे त्यांनी सांगितले. रहाटणीतील विमल गार्डनमधील त्यांच्या या सभेला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे आदींसह अश्विनी जगताप व्यासपीठावर होते.

पंकजांचे यावेळचे वीस मिनिटांचे भाषण त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीतच झाले. शास्तीकर माफीसारखा न्याय तुम्हाला आधी का मिळाला नाही, अशी विचारणा करीत भाजप राज्यात सत्तेत आल्यानंतरच ही पूर्ण करमाफी झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मतदान मागणारे आम्ही वधूपक्षाकडील मंडळी आहोत, असे त्या नर्मविनोदी शैलीत म्हणताच, उपस्थितांनीही त्याला हसून दाद दिली.

शास्तीचा प्रश्न मिटवल्यानंतर आता शहरवासियांचा प्रॉपर्टी कार्डचीही समस्या मार्गी लावणार असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.अश्विनीताईंच्या विजयानंतर तसेच प्रॉपर्टी कार्ड वाटपासाठी मला बोलवा,असे त्या आपल्या स्टाईलमध्ये म्हणताच पुन्हा टाळ्या झाल्या.

अश्विनी जगताप यांच्या प्रचाराला महिलांच्या डोळ्यात पाणी
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाची उमेदवारी जाहीर होताच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून त्यांच्या पत्नी आणि भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी जिवाची पर्वा न करता पक्षानिष्ठा दाखवून दिली होती. त्यामुळे त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या प्रचार मोहिमेत भाजप आणि मित्रपक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची त्यांना परिवारासारखीच साथ मिळत आहे. त्यांच्या साथीने अश्विनी जगताप यांनी प्रचारात आघाडी घेत संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. त्यांच्या प्रत्येक भेटीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या आठवणीने लोक अक्षरशः गहिवरत आणि रडत असल्याचे चित्र आहे.तुम्हाला एक लाखांहून अधिक मताधिक्यांनी विजयी करूनच आम्ही लक्ष्मणभाऊंना खरी श्रद्धांजली वाहणार आहोत, असे वचनच लोक त्यांना देत आहेत.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या गृह भेटीला मतदारसंघातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. चांगले वक्तृत्व आणि महिला व युवतींशी सहज संवाद यामुळे त्यांचा गृहभेट दौरा निवडणूक प्रचारात कमालीचा प्रभावी ठरतो आहे. दररोज शेकडो घरात जाऊन त्या महिलांशी संवाद साधत आहेत. त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. त्यांच्या प्रत्येक भेटीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींनी लोक गहिवरत असल्याचे दिसून येत आहे. अनेकजण अक्षरशः रडतातडोळ्यात अश्रू घेऊनच लोक चिंचवड मतदारसंघ आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी लक्ष्मण जगताप यांनी केलेले काम तसेच सर्व जाती-धर्मातील लोकांना केलेल्या मदतीला उजाळा देत आहेत. अश्रू पुसत पुसत अश्विनी जगताप यांना आम्ही तुम्हाला केवळ आमदार बनवणार नाही, तर मताधिक्याने निवडून देणार आहोत, असे वचनच हे लोक देत आहेत. त्यावरून लक्ष्मण जगताप यांच्या निधनाचे दुःख लोकांच्या मनातून गेलेले नसल्याचे जाणवत आहे. उलट निवडणूक प्रचारात अश्विनी जगताप यांच्या भेटीनंतर लोकांच्या मनात लक्ष्मणभाऊ जगताप यांचे स्थान किती अढळ आहे याची प्रचिती येत आहे. लोकांच्या या प्रेमामुळे भारावलेल्या अश्विनी जगताप दिवंगत पती लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेने उत्साहाने प्रचार करत असल्याचे चित्र आहे.

`श्रीमंती` मध्ये राहुल कलाटे नंबर वन, तब्बल ६१ कोटींचे मालक
चिंचवड, दि. ८ (पीसीबी) : शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले राहुल कलाटे हे तब्बल ६१ कोटींचे मालक आहेत. त्यांच्यावर एक कोटी दहा लाख सात हजार २४८ रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. तुलनेत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांची स्थावर-जंगम मालमत्ता २३ कोटींची तर महाआघाडीचे उमेदवार नाना काटे यांची २० कोटींचे धनी आहेत.

राहुल कलाटे हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. कलाटे कुटुंबीयांची जंगम मालमत्ता एक कोटी ४० लाख २० हजार ५९३ आहे. कलाटे यांची स्थावर मालमत्ता ६० कोटी तीन लाख ७६ हजार ३१९ रुपये आहे, तर जंगम आणि स्थावर मालमत्ता ६१ कोटी ४३ लाख ९६ हजार ९१२ रुपयांची आहे. कलाटे यांच्यावर एक कोटी दहा लाख सात हजार २४८ रुपयांचे कर्ज आहे. कलाटे यांनी स्वत:चा शेती उत्पन्न आणि व्यापार हा उत्पन्नाचा स्त्रोत दाखविला असून त्यांची पत्नी गृहिणी आहे.

कलाटे यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील खेड, मुळशी तालुक्यांत शेतजमिनी आहेत, तर रहाटणी, वाकड येथे सदनिका आहेत. कलाटे यांच्याकडे ९२ हजार ६४० रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे ५३ हजार ७५० रुपये रोख रक्कम आहे. कलाटे यांच्याकडे १५ तोळे सोने, तर त्यांच्या पत्नीकडे ५२ तोळे दोन, दोन किलो चांदी आहे. कलाटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कलाटे यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५६ लाख ७३ हजार ९४०, तर त्यांच्या पत्नीचे पाच लाख ६६ हजार ३३० रुपये उत्पन्न दाखविले आहे.

अश्विनी जगताप यांच्याकडे २१८ तोळे सोनं, १४२८ तोळे चांदी, औंध येथे व्यापार संकुल, केसे (ता. कराड) येथे शेतजमीन, आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावे मरकळ, कोयाळी , पिंपळे गुरव येथे शेतजमीन आहे.बालेवाडीत एक निवासी इमारत देखील आहे. १६ कोटी ८२ लाख रुपयांचे जंगम मालमत्ता, ६ कोटी २१ लाखाची स्थावर मालमत्ता, ६ कोटी ६१ लाखाचे कर्ज, ६६ लाख रुपये वार्षीक उत्पन्न असा तपशील आहे. त्यांचे दिवंगत पती आमदार लक्ष्मण यांचे वार्षिक उत्पन्न ६४ लाख आणि दत्तक मुलगा आदित्य याचे ३७ लाख दाखवले आहे.

नाना काटे यांच्याकडे ३५ तोळे सोनं, ४ कोटी ५२ लाखाची जंग मालमत्ता, १५ कोटी २९ लाखाची स्थावर मालमत्ता, एक कोटी ९० लाखाची देणेदारी आणि वर्षाकाठी १४ लाख ९७ हजार उत्पन्न आहे. पिंपळे सौदागर, रहाटणी येथे घर आणि कान्हूर मसाई, मुखई, रहाटणी येथे शेती आहे

`आप` ची चिंचवडमधून मारुती भापकर यांना `ऑफर`
– कलाटे यांचे नाव निश्चित केल्याने राष्ट्रवादीतून बंडाचा इशारा

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकिसाठी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने नाना काटे, भाऊसाहेब भोईर हे प्रबेळ दावेदार आहेत, पण आयत्यावेळी सर्वात तगडे नाव म्हणून शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्या नावाची घोषणा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कलाटे यांचे नाव सर्व बातम्यांतून पुढे आल्यामुळे राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता परसली असून प्रसंगी बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या स्पर्धेत आता अरविंद केजरीवाल यांच्या आप कडून सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना थेट दिल्लीतून ऑफर आल्याने खळबळ आहे.

पोटनिवडणुकिसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी असून मतदान २७ फेब्रुवारी रोजी तर मतमोजणी २ मार्चलो होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत अवघे तीन दिवस असल्याने आता इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. कधी नव्हे इतक्या म्हणजे ९७ जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने रंगत वाढली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या सोमवारी दुपारी एक वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाआघाडीचे नाव आज किंव उद्या जाहीर होणार असून तो अर्जसुध्दा सोमवारीच दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.

…तर नाना काटे बंडखोरी करणार –

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकिसाठी चिंचवडची पोटनिवडणूक अत्यंत महत्वाची असल्याने भाजप विरोधात सर्व विरोधकांचा मिळून एकच उमेदवार असावा असा अजित पवार, संजय राऊत, नाना पटोले यांच्या प्रयत्न आहे. या स्पर्धेत आणखी काही बलाढ्य नावे आयत्यावेळी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाआघाडी म्हणून राष्ट्रवादीच्याच निष्ठावंताला संधी द्यावी, कलाटे यांचे नाव जाहीर केले तर प्रसंगी नाना काटे बंडखोरीच्या तयारीत असल्याचे समजले. शिवसेनेचे राहुल कलाटे सोडून राष्ट्रवादीमधूनच नाना काटे, भोईर, मयूर कलाटे यापैकी एकाला संधी द्यावी अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या सर्व माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्याकडे केल्याने अस्वस्थता वाढली आहे.

दरम्यान, उमेदवारांच्या स्पर्धेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आप कडूनही आता चाचपणी सुरू असून पूर्वाश्रमिचे आपचे खंदे कार्यकर्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना विचारणा कऱण्यात आली आहे. नवी दिल्ली येथून आपचे दोन वरिष्ठ नेते केजरीवाल यांचा निरोप घेऊन भापकर यांच्या भेटीला शुक्रवारी आले होते. स्वतः भापकर यांनी अदयाप त्याबाबत आपले मत कळविलेले नाही. भाजप विरोधात ताकदिचे उमेदवार देण्याचा आपचा प्रयत्न असून भापकर यांच्यासह महापालिकेचे निवृत्त अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या नावावरसुध्दा चर्चा सुरू असल्याचे समजले.