Pimpri

पिंपरी विधानसभेतून आमदार चाबुकस्वार यांना शिवसेनेची उमेदवारी

By PCB Author

September 29, 2019

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी विधानसभेतून शिवसेनेने आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली असून उद्धव ठाकरे यांनी चाबुकस्वार यांच्यासह अनेक विद्यमान आमदारांना एबी फॉर्मचे आज मुंबई येथे वाटप करण्यात आले.

युतीच्या वाटाघाटीत पिंपरीची जागा भाजप मागत असताना युती होण्याअगोदरच शिवसेना पक्षाने या जागेसाठी उमेदवारही जाहीर करून टाकला आहे. त्यामुळे पिंपरीची जागा भाजपला मिळण्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. २०१४ साली भाजप व शिवसेनेची युती शेवटच्या क्षणात तुटली. त्यामुळे भाजपने ही जागा आपल्याबरोबर आलेल्या आरपीआय (आठवले गट) पक्षाला सोडली होती. मात्र, आरपीआय-भाजप युतीच्या उमेदवाराला शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी पराभूत केले.

दरम्यान, २०१४ विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर युतीत असलेला आरपीआय पक्षही या जागेसाठी आग्रही होता.