१५ दिवसांत औषधे उपलब्ध न झाल्यास अधिकाऱ्यांना काळे फासणार – शिवसेना

467

महापालिकेला दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रूग्णालयात अॅन्टी रेबिज लसीसह इतर अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. महापालिका दरवर्षी कोट्यावधी रूपयांची औषधे खरेदी करूनही औषधांचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या शंकेला वाव मिळत असून १५ दिवसांत औषधे व लस उपलब्ध न झाल्यास वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल. असा ईशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक हरेश नखाते, विभाग प्रमुख प्रदीप दळवी यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी गोरख पाटील, अंकुश कोळेकर, गणेश वायभट, गणेश आहेर, अक्षय टिळेकर, अमित इथापे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील महापालिका रूग्णालयात अतिमहत्त्वाच्या लसी व औषधे नसल्याकारणाने नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे 15 दिवसांत औषधे उपलब्ध केली नाहीत. तर वैद्यकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना काळे फासून शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात नमुद केले आहे.