महेश लांडगे यांच्या विजयासाठी शिवसेनेच्या रणरागिणी उतरल्या मैदानात

411

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – भोसरी विधानसभा मतदारसंघात पन्नास टक्के महिला मतदार आहेत. प्रचारात त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडून महिलांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता होण्यासाठी महायुतीला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका सुलभाताई उबाळे यांनी येथे केले.

उबाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या रणरागिणींनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका सुलभाताई उबाळे यांच्या नेतृत्वखाली महिला आघाडीचा स्नेहमेळावा यमुनानगर येथे झाला. यावेळी उबाळे बोलत होत्या. महायुतीचे उमदेवार आमदार महेश लांडगे ह्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या मेळाव्याला महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा लांडगे, माजी नगरसेविका सुनीता गवळी, वेदश्री काळे, शशीकला उभे, जनाबाई गोरे, गौरी घंटे, रुपाली आल्हाट, नंदा दातकर, राजश्री पाटील, निर्मला पाटील, पुष्पा मुतंडीकर, मनीषा परांडे, भारती चकवे, कोमल साळुंखे, विजया जाधव, दीपा गुरव, प्रतीक्षा लोयरे, श्रीदेवी लामझने यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

उबाळे म्हणाल्या की, “भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या विजयासाठी महिलांनी कंबर कसली आहे. यमुनानगरमधून घराघरातून मतदार बाहेर काढण्याची जबाबदारी महिलांनी घेतली आहे. यमुनानगरमधून आमदार लांडगे यांना मोठे मताधिक्य मिळेल,” असा विश्वास, उबाळे यांनी व्यक्त केला. युवती अधिकारी प्रतीक्षा घुले यांनी आभार मानले.

WhatsAppShare