Maharashtra

पूरग्रस्तांच्या मदतीत राष्ट्रवादीचा मोठा सहभाग असल्याचा मला आनंद – शरद पवार

By PCB Author

August 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – राज्याच्या पूरपरिस्थितीवर अनेक मदतीचे हात मिळत आहे. मात्र यात मोठा आकडा आपल्या पक्षाचा आहे याचा आनंद आहे. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाही. यासाठी आपण पक्षाच्या संघटनेकडे लक्ष घालणे गरजेचे आहे, हे कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. येत्या २० तारखेला मुख्यमंत्र्यांना निवदेन देण्यात येईल यात शासनाने मदत केली तर ठीक, नाहीतर रस्त्यावर उतरण्याचे काम होईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक मुंबई मध्ये पार पडली. या नंतर महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, देश चहूबाजूंनी संकटात आहे. आपला पक्ष हा विकासासोबत अन्यायावर मात करणारा पक्ष आहे. यासाठी संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. यातून पक्षाला फायदा आहेच त्यासोबतच राज्याला देखील मोठा फायदा आहे. राज्यात दोन वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण झाल्या आहे. एका ठिकाणी पूरपरिस्थिती तर एका ठिकाणी कोरडा दुष्काळ आहे. देशातून अनेक ठिकाणाहून मदतीचा हात येत आहे. आज अशी परिस्थिती असतानाही आपण आलात याबद्दल आपले आभार मानतो असे शरद पवार महिला कार्यकर्त्यांना उद्देशून बोलले.