शरद पवार, धनंजय मुंडे आज पूरग्रस्त सांगली-सातारा भागाचा दौरा करणार

0
438

मुंबई, दि. १० (पीसीबी) – गेल्या पाच दिवसापासून सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आणि अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. राष्ट्रवादी काँग्रेस देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहे आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

या दौऱ्यात ते पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत करणार आहेत. महाराष्ट्राच्या काही भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही . मात्र कोल्हापूर सांगली सारख्या जिल्ह्याचे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले.