एसबी पाटीलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय व स्टुडेंट्स ओलिम्पिक स्पर्धेत मोलाची कामगिरी 

198

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित रावेत येथील एस बी पाटील ज्यू. कॉलेजचा विद्यार्थी रोहित कुमावत याने स्टुडंट ओलम्पिक स्पर्धेत कराटे खेळामध्ये १९ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक तर वेटलिफ्टिंगमध्ये रोहन कलाने व्दितीय क्रमांक मिळवला. तसेच पिंपरी चिंचवड महापालिका व पुणे जिल्हा क्रिडा परिषद यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात प्रणिता मुळेने प्रथम, तलवारबाजीत प्रतिष्ठा पंजाबीने प्रथम तर बुद्धिबळमध्ये सुरभी शर्मा हिने व्दितीय क्रमांक मिळविला.

विभागीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पदमा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, भाईजान काझी, सीईओ गिरीष देसाई, सोमनाथ कासार, कानेटकर सर तसेच प्राचार्य संदीप पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना कॉलेजचे क्रिडा शिक्षक प्रदीप कासार यांनी प्रशिक्षण व मोलाचे मार्गदर्शन केले.