कोल्हापूर पुरग्रस्तांना नगरसेविका सविता खुळे यांचे गो-दान; शेतकऱ्यांना मिळाला मोठा आधार

155

करवीर, दि. ५ (पीसीबी) – कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखली (ता. करवीर) गावातील पूरग्रस्त आणि गरजू शेतकऱ्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका सविता नरेश खुळे यांच्या वतीने गो-दान करण्यात आले. हा कार्यक्रम प्रयाग चिखली गावात ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पार पडला.

त्यावेळी नगरसेविका खुळे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य एस. आर. पाटील, सरपंच उमाताई पाटील, साबळेवाडीचे सरपंच तानाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष रंगप्पा मोहिते तसेच पिंपरी चिंचवड येथील कार्यकर्ते नारायण खामकर, बाळकृष्ण गायकवाड, हनुमंत कुरूळे, योगेश दादा चौघुले, शाम गोडांबे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते

महापुरात प्रयाग चिखली गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सुमारे एक हजार जनावरे वाहून गेली, यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यातून सावरण्याचे बळ मिळावे, यासाठी १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या गाईंना नगरसेविका सविता नरेश खुळे यांनी दान केले आहे.