#SakinakaRapeIncident | फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे करणार – नवाब मलिक

0
291

मुंबई,दि.११(पीसीबी) – साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या महिलेसोबत दुष्कर्म करण्यात आला होता. त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पण आरोपीला अटक केल्यानंतर निश्चित रुपाने सरकार लवकरात लवकर चार्जशीट दाखल करेल. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू, तसा आग्रह गृहमंत्र्यांना धरू. लवकरात लवकर कडक शिक्षा मिळाली पाहिजे. या शिक्षेने आरोपींच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे अशी शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं मलिक यांनी सांगितलं.