Desh

Revolt ची भारतातील पहिली ई-बाईक;  एकदा चार्ज केल्यास १५६ किमी प्रवास

By PCB Author

June 20, 2019

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – Revolt Motors ने मंगळवारी (दि.१९) भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक Revolt RV 400 सादर केली आहे. ही पूर्णतः इलेक्ट्रिक बाईक असून पुढील महिन्यात ही बाईक लाँच केली जाईल. ही बाईक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI – Artificial Intelligence) वर काम करत असल्यामुळे तुम्ही व्हॉईस कमांड देखील देऊ शकता. केवळ एक हजार रुपयांमध्ये २५ जूनपासून या बाइकसाठी आगाऊ नोंदणी देखील सुरू होत आहे.

सुरूवातीला ही बाईक केवळ दिल्लीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल, त्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये ही बाइक पुणे, बंगळुरु, हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद आणि चेन्नई येथेही उपलब्ध होईल. रेबेल रेड आणि कॉस्मिक ब्लॅक या दोन रंगांमध्ये ही बाईक उपलब्ध असेल.

आर्टिफिशिअल इंटेलिजंस (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता फीचर असलेली ही बाईक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १५६ किलोमीटर पर्यंतचा प्रवास करु शकते असा कंपनीचा दावा आहे. या बाईकचा टॉप स्पीड ८५ किलोमीटर प्रतितास आहे. घरातील १५ अँपीयर प्लग पॉइंटवर देखील चार्जिंग करता येईल, त्यासाठी कोणत्याही वेगळ्या व्यवस्थेची गरज नाही. पोर्टेबल बॅटरी चार्जरसह ऑन-बोर्ड चार्जिंगची सुविधाही मिळेल. याशिवाय ज्या शहरांमध्ये बाइकची विक्री होईल तेथे मोबाइल बॅटरी स्वॅपिंग पॉइंट लाँच करेल, तसेच बॅटरीची होम डिलिव्हरी देखील केली जाणार आहे.