Bhosari

Remdesivir या औषधाचे उत्पादन कमी वेळात, कमी खर्चात व मोठ्या प्रमाणावर करता येणार; भोसरीच्या तरुणाचं संशोधन

By PCB Author

September 18, 2020

भोसरी,दि.१८(पीसीबी) – भोसरी येथील डॉ. दिनेश जगन्नाथ पायमोडे (पि. एच. डी., रसायनशास्त्र) हे सध्या अमेरिकेतील ‘Medicines For All’ (Virginia Commonwealth University) या संशोधन संस्थेमध्ये ‘शास्त्रज्ञ’ पदावर कार्यरत आहेत. डॉ. दिनेश यांनी ‘Remdesivir’ या Covid-19 वर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे संशोधन केले व ते यशस्वी झाले आहे.

त्यांचे हे योगदान, American Chemical Society च्या ‘Organic Letters’ या रसायनशास्रातील प्रसिद्ध नियतकालिकात काल दि. १५/०९/२०२० रोजी प्रकाशित झाले. याद्वारे औषध कंपन्यांना Remdesivir या औषधाचे उत्पादन हे कमी वेळात, कमी खर्चात व मोठ्या प्रमाणावर करता येणार आहे. परिणामी आगामी काळात, Remdesivir च्या किमती जागतिक बाजारपेठेत कमी होण्यास मदत होईल व सर्वसामान्य लोकांना ते सहज उपलब्ध होईल. ह्या संशोधन प्रक्रियेत दिनेश च्या team ला ‘Bill and Melinda Gates Foundation’ या संस्थेने अर्थसाहाय्य केले आहे.