पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्सकडून ५ कोटींची मदत

0
526

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मुसळधार पाऊसामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर सर्व स्तरावरून पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. आता या मदतकार्याला रिलायन्सनेही हातभार लावला आहे. रिलायन्सकडून सोमवारी पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी ५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही ‘कौन बनेगा करोडपती च्या पत्रकारपरिषदेत पूरग्रस्तांसाठी मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पूरग्रस्तांसाठी ५१ लाखांचा धनादेश शासनाकडे सुपूर्द केला आहे. याबद्द्ल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू त्यांचे आभार मानले. तसेच तुमच्या मदतीमुळे इतरांनाही पूरग्रस्तांच्या पुनर्वसानासाठी मदत करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.राज्यातील सामान्य नागरिकांकडून जमेल त्याप्रकारे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त नागरिकांची मदत करीत आहेत .