पिंपरीतील महायुती व आघाडीतील बंडखोरांचे बंड शमले

0
759

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी विधानसेभेत भाजप-शिवसेना-आरपीआय महायुती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीत अनेकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे मत विभागणी होऊन पक्षाच्या उमेदवाराला त्याचा फटका बसण्याची शक्यता होती. म्हणून पक्षश्रेष्ठींच्या दबावामुळे या बंडखोरांनी अखेर आज शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

भाजपमधील बंडखोर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, उत्तम हिरवे, भिमा बोबडे तर आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी उमेदवारी माघारी घेतली आहे.

तर पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा धर, शेखर ओव्हाळ आणि काँग्रेसचे मनोज कांबळे, राजू बनसोडे, सुंदर कांबळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. तसेच यांच्यासह विजय रंदिल, संदिपान झोंबाडे,सतिश भवाळ, गौरीशंकर झोंबाडे यांनीही अर्ज मागे घेतले आहेत.

दरम्यान, पिंपरी विधानसभा मतदार संघात एकुण ३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यातील एकूण १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने १८ उमेदवारच निवडणूक रिंगणात आहेत.