शिवसेनेन उमेदवारी दिल्यास रश्मी बागलांचा सामना राष्ट्रवादीच्या संजय मामांशी

0
341

सोलापूर, दि. २० (पीसीबी) – करमाळ्याच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल-कोलते ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी सोडत आज दुपारी १२ वाजता मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहे. बागल यांच्या शिवसेना प्रवेशाने विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या अडचणी वाढ होणार  असून, दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजय शिंदे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून बागल यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा सामना संजय मामा शिंदे यांच्याशीच होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

रश्मी बागल यांनी सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घोषित केला आहे. बागल गट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे एका बाजूला संजय शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँगेसचा मार्ग मोकळा होत आहे. तर करमाळ्याचे विद्यमान शिवसेना आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवारीला कात्री लागण्याची शक्यता आहे. पाटील यांच्याकडून शिवसेनेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.

तर दुसरीकडे, “तिकीट मिळण्याची खात्री आहे, म्हणूनच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमच्यावर होणा-या अन्यायाबाबात पत्र लिहुन, मेसेज टाकून ही काही प्रतिपादन मिळाला नाही. शेवटी कार्यकर्त्यांच्या साठी आम्ही हा निर्णय घेतला. आमची माणसे असुरक्षितत झाली. तयावर इलाज म्हणून हा निर्णय आहे. पाच वर्ष पोळलो आहे. आजपर्यंत चुका झाला आता त्याच चुका परत करायच्या नाहीत.” असे विधान रश्मीबागल यांनी केले आहे.