विधानसभा निवडणूकीच्या कडेकोट बंदोबस्तासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालय सज्ज

0
586

पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांची माहिती 

पिंपरी, दि. 18 (पीसीबी) – विधानसभा निवडणूकीचे मतदार संपर्ण राज्यात सोमवारी (दि. 21) होत असून त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खडकवासला, भोर, वडगावशेरी व खेड-आळंदी या आठ विधानसभा मतदार संघांमध्ये एकुण 417 मतदान केंद्रे व 1716 बुथवर मतदान होणार आहे. त्याकरिता आयुक्तालयातील एकुण तीन पोलिस तीन उपायुक्त, सात सहाय्यक आयुक्त, 50 निरिक्षक, 214 सहाय्यक निरिक्षक व उपनिरिक्षक व 2450 इतके पोलिस कर्मचारी उपलब्ध आहेत. तसेच पोलिस महासंचालकांकडून बंदोबस्ताकामी दोन पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, आठ सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी, 10 निरिक्षक, 25 सहाय्यक निरिक्षक, 442 कर्मचारी, 800 होमगार्ड तसेच अधिक 400 होमगार्ड कर्नाटक राज्याकडून उपलब्ध झाले आहेत. अशा प्रकारे सुमारे 4411 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.

 

पोलिस आयुक्त बिष्णोई म्हणाले की, “सीएपीएफ व आरपीएफच्या प्रत्येकी दोन कंपनी बंदोबस्तासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. मतदान केंद्र व बुथ या ठिकाणी 994 पोलिस कर्मचाऱ्याने व 962 होमगार्ड नेमण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ईव्हीएम वाटप केंद्र 4, स्टाँगरूम, संवेदनशील मतदान केंद्र, सीएपीएफ डेव्हलोपमेंट, महसुली सेक्टर 169, पोलिस सेक्टर 63, वरिष्ठ अधिकाऱ्यासोबतचा बंदोबस्त, नियंत्रण कक्ष स्ट्रायकिंग फोर्स-2, चेक पोस्ट-12, स्टॅटिक सर्व्हेलन्स टिम-39, फ्लाईंग स्क्वॉड-39 असा बंदोबस्त नेमण्यात आला आहे.”

 

40 बुथ संवेदनशील

निवडणूक आयोगाच्या परिमाणानुसार आयुक्तालयाच्या हद्दीत एकुण 40 बुथ संवेदनशील असून तळेगाव दाभाडेतील बुथ अति संवेदनशील आहे. या बुथवर सीएपीएफचे हाफ सेक्शन नेमण्यात आले आहे. तर इतर 39 बुथवर सुक्ष्म निरिक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच 10 व 10 पेक्षा अधिक बुथ असलेली एकुण 21 मतदान केंद्रावर प्रत्येक ठिकाणी सीएपीएफचे हाफ सेक्शन व एक अधिकारी नेण्यात आला असल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.

 

दरम्यान, निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदान कालावधीत कोणाताही अनुचित प्रकार घडू नये, या करिता तात्काळ कारवाईसाठी गुन्हे शाखेची सात विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. आगामी विधानसभा निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी त्या अनुषंगाने आयुक्तालय हद्दीतील क्रियाशील गुन्हेगार, हिस्ट्रशीटर, तडीपार गुन्हेगार यांचे विरोधात विशेष मोहिम राबवून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे.

 

21 सप्टेंबरपासून आजतागात केलेली कारवाई पुढील प्रमाणे : पाहिजे आरोपी अटक – 44, फरारी आरोपी अटक – 03, एमपीडीए कारवाई – 02, मोका कारवाई – 02, अमली पदार्थ – 05 (जप्त मुद्देमाल- 8,97,950), आर्म अॅक्ट – 22 (जप्त हत्यारे 28), प्रोव्हिबीशन – 295 (जप्त माल 54,87,514), हत्यारे जमा – 840 पैकी 809

 

आयुक्त विष्णाई पुढे म्हणाले की, “आचारसंहिता लागू झाल्यानंतर आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांतर्गत स्थानिक पोलिस बल व सीएपीएफ, एसआरपीएफ यांच्यासह एकुण 24 रूट मार्च घेण्यात आले. विविध गुन्हेगारी वस्त्यांमध्ये 42 कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. विशेष मोहिम राबवून मागील 10 वर्षांतील एकुण तडीपारीची मुदत संपलेले 203 व सध्या तडीपारी चालु असलेले 106 गुन्हेगार चेक करण्यात आले.”

 

“मागील 10 वर्षांतील एकुण 27 मोका केसेसमधील 232 अटक आरोपींची सध्यस्थिती चेक करण्यात आली, त्याचबरोबर मागील 10 वर्षांतील एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध असलेले व स्थानबद्धतेची मुदत संपलले एकुण 18 आरोपी चेक करण्यात आले. आयुक्तालयाचे रेकॉर्डवरील 244 हिस्ट्रीशीटर गुन्हेगार चेक करण्यात आले. जे गुन्हेगार जामीनावर बाहेर आहेत, परंतु त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. अशा सर्व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.”

 

दरम्याम, आचारसंहिता भंगाचे एकुण पाच गुन्हे दाखल आहेत. निवडणूक मतदान हे निर्भय वातावरणात, नि:पक्षपातीपणे, शांततेने व सुरळीतपणाने पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस दल तयारीनिशी सुसज्ज आहे. अशी ग्वाही आयुक्त बिष्णोई यांनी यावेळी दिली.