विकास कामांसाठी २ कोटी ४८ लाखांच्या खर्चास स्थायी समितीची मान्यता

388

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी येणाऱ्या एकूण सुमारे २ कोटी ४८ लाख रूपये खर्चास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

त्यामध्ये प्रभाग क्र. २० मधील कासारवाडी येथील मायानगरी व इतर परिसरात ३० लाख ३४ हजार रूपयांची पेव्हींग ब्लॉक विषयक कामे, कासारवाडी परिसरातील विविध भागात ३० लाख ४२ हजार रूपयांच्या पेव्हींग ब्लॉक विषयक कामे व मायानगरी जवळील नाल्यांची ३० लाख ३४ हजार रूपयांच्या कामांचा समावेश आहे.

तसेच प्रभाग क्र. २७ रहाटणी मधील तापकीर नगर व श्रीनगर परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेने सुमारे ३१ लाख ५९ हजार स्ट्रॉर्म वॉटर व गटर्सची कामे, प्रभाग क्र.२ (सेक्टर क्र. १४) बोऱ्हाडेवाडी येथील प्राधिकरणाकडून ताब्यात आलेल्या जागेस ९२ लाख ५८ हजार रूपयांची स्थापत्य विषयक सिमाभिंत बाधणे, चऱ्होली येथे २० द.ल.लि. / दिन क्षमतेचे अत्याधुनि क तंत्रज्ञानावर आधारित मैलाशुद्धीकरण केंद्र बांधणेचे काम पुर्ण झाले असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण तर्फे मंजुर करण्यात आलेला वाढीव विद्युत पुरवठयाच्या आदेशानुसार चऱ्होली मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठी विद्यत कनेक्शन घेणे कामी महावितरणला ३२ लाख ८ हजार रूपयांचे शुल्क अदा करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर महापालिकेच्या विद्युत विभागाकडील विविध विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३ कोटी ४५ लाख खर्चासही यावेळी मान्यता देण्यात आली.