PCBToday आयोजित ‘माझा बाप्पा लय भारी २०२१’ या ऑनलाईन घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर; पाहा कोण आहेत विजेते???

60

पिंपरी, दि.११ (पीसीबी) : पीसीबीटूडे (पिंपरी चिंचवड बुलेटिन) आयोजित ‘माझा बाप्पा लय भारी २०२१’ या ऑनलाईन घरगुती गणपती सजावट स्पर्धेला महाराष्ट्रासह इतर राज्यातील बाप्पा प्रेमींकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर जम्मू काश्मीर, गुजरात आणि टोकियो मधून सुद्धा प्रतिसाद मिळाला.

अनेक हौशी स्पर्धकांनी म्हणजेच बाप्पाप्रेमींनी अतिशय सुरेख पद्धतीने गौरी-गणपती सजावट केली होती. जी अगदी वाखाणण्याजोगी होती. फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर अगदी देश, विदेशातूनही मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या नियमानुसार फेसबुक आणि इंस्टाग्राम मिळून ज्या स्पर्धकांनी फेक लाइक्स न मिळवता योग्य पद्धतीने सर्वाधिक लाईक्स मिळवले, अशा पहिल्या तीन स्पर्धकांना विजेते घोषित करण्यात आले आहे. ज्या स्पर्धकांनी स्पर्धेचे नियम पाळत फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती प्रामाणिकपणे खरेखुरे लाइक्स मिळवले आहेत अशा स्पर्धकांचे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले आहेत. काही स्पर्धकांनी या नियमांचं उल्लंघन करून फेक (Fake) लाईक्स मिळविले आहेत, त्यामुळे या स्पर्धेच्या नियमांनुसार अशा स्पर्धकांना स्पर्धेतून बाद करण्यात आलं आहे. तर ‘त्या’ ३ विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे…

“माझा बाप्पा लयभारी २०२१” विजेते स्पर्धक :-

* प्रथम क्रमांक : सायली प्रकाश जावळकर (कसबा पेठ, पुणे)
* द्वितीय क्रमांक : शिवानी खडसे ( नागपूर )
* तृतीय क्रमांक : सौरभ देशमाने ( सांगवी )

     पीसीबीटुडे (PCBToday) कडून सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन. आणि सहभागी स्पर्धकांचे आभार…

WhatsAppShare