पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ घालणारा आंदोलक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता – नगरसेवक अभिषेक बारणे 

482

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – अनधिकृत बांधकाम, रिंग रोड आणि शास्ती कराचा विषय पुढे करत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या थेरगाव येथील जाहीर सभेत गोंधळ घालणारा तो आंदोलक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रविवारी (दि. १३) झालेला हा प्रकार केवळ राजकीय हेतूने जाणीवपूर्वक नियोजनबद्ध केला असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक अभिषेक बारणे यांनी केला आहे.

त्यासंदर्भात त्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत. अनधिकृत बांधकाम आणि शास्तीकर हा विषय राजकारणाचा नसून तो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली अनेक वर्ष हा प्रश्न सुटत नाही, त्यामुळे लक्ष्मण जगताप यांनी स्वत:च्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. भाजपच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करून नागरिकांची हि टांगती तलवार काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यात त्यांना चांगले यश देखील आले. त्यामध्ये शहरातील एक हजार फुटाच्या आतील ७५ हजार बांधकामांपैकी ५५ हजार बांधकामाचा शास्तीकर माफ झाला. तसेच प्राधिकरण बाधित घरांची आर्थिक दुर्बलांची दीड हजार फुटाच्या आतील जागा निशुल्क नागरिकांच्या मालकीची होणार आहे. त्यामुळे शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. परंतु विरोधी पक्षाकडून जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि हे सर्व नागरिकांच्या देखील निदर्शनास आले आहे. असे नगरसेवक बारणे यांनी प्रसिद्धी पत्रकांत म्हटले आहे.

WhatsAppShare