Maharashtra

सहाव्या दिवशीही सांगली आणि कोल्हापुरात पुराचे संकट कायम

By PCB Author

August 10, 2019

कोल्हापूर दि. १० (पीसीबी) – सलग सहाव्या दिवशी सांगली आणि कोल्हापुरात पुराचे संकट कायम आहे. दोन लाखांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येते आहे. ग्रामीण भागात जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.

कोल्हापुरात कालपासून दीड फूट पाणी कमी झाले आहे. पाऊस सतत सुरुच आहे. वीज नाही, घरात पाणी, रस्ते पाण्याने तुंबलेले, सर्व बाजूने फक्त पाणी अशी स्थिती आहे. ग्रामीण भागात स्थिती अत्यन्त बिकट आहे. अजूनपर्यंत तिथे मदत पोहचली नाही. स्थानिक पातळीवर लोकं एकमेकांना मदत करत आहेत.

#Floods2019@NDRFHQ carrying out rescue ops in Maharashtra. The force has distinguished itself with capability, courage and commitment.#maharashtrafloods pic.twitter.com/dd3ggdz9XU

— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) August 9, 2019

पंचगंगा नदीची पातळी १ ते दीड फूट कमी झाली आहे. पण त्यामुळे स्थितीत फारसा फरक पडला नाही अजूनही वस्तींमधले पाणी कायम आहे. शिरोळ तालुक्यात नौदल मदतीचे काम करते आहे. सकाळी सहा वाजताच नौदलाची १४ पथके या गावातल्या नागरिकांना वाचवण्यासाठी त्या दिशेने रवाना झाली आहेत. सांगलीत पावसाचा जोर ओसरला आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या घराबाहेरही पाणी साचले होते.