क्रांतीवीर उमाजी नाईक यांना रहाटणीत अभिवादन

128

रहाटणी, दि. 7 (पीसीबी) – आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त रहाटणीगाव येथील श्रीराम मंदिर येथे त्यांच्या प्रतिमेला विधी समितीचे माजी सभापती व माजी नगरसेवक कैलास थोपटे आणि स्विकृत सदस्य सागर कोकणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी गणेश चव्हाण, संदीप गोडांबे, शाम राजवाडे, अजय कदम, राजेश नढे, राम काळभोर, राजेंद्र भागत, देविदास तांबे, गणेश कापसे, अरूण तांबे, संतोष ताकवाले यांच्यासह सुवर्ण मित्र मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कै. शिवाजी बाळा चव्हाण (नाईक) प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. त्या प्रसंगी उमाजी नाईक यांच्या पराक्रमांच्या आठवणींना उजाळा व त्यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या.