गोरगरीब जनतेसाठी नरेंद्र मोदी अविरतपणे कार्य करीत आहेत – आमदार लक्ष्मण जगताप

0
708

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या देशाचा दबदबा निर्माण केला आहे. त्याचबरोबर देशातील गोरगरीब जनतेसाठी मोदी अविरतपणे कार्य करीत असून सामान्य माणसाचा उद्धार करण्यासाठी ते कार्यरत आहेत. याचा प्रत्येकाला अभिमान आहे, त्यांच्याकडून अशीच देशसेवा घडत राहो. असे मत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना व्यक्त केले.

पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताहच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी आमदार बोलत होते. चिंचवडमधील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आश्रमात आमदार लक्ष्मण जगताप व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपसभापती डॉ. हेमंत तापकीर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अन्नधान्य व स्वच्छता साहित्य देण्यात आले. तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

तसेच रहाटणी-काळेवाडी परिसरात नागरिकांना केंद्र, राज्य सरकार व महापालिकेच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली

डॉ. हेमंत तापकिर म्हणाले की, “पंतप्रधान मोदी हे गरीब आणि गरजूंसाठी समर्पित भावनेने काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस सेवा सप्ताहाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे, यामध्ये समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या कल्याणासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत आहे आणि हे कार्य कार्यकर्त्यांनी अखंडपणे चालू ठेवले पाहिजे.”

या प्रसंगी नगरसेवक चंद्रकांत नखाते, महिल बालकल्याण सभापती निर्मला कुटे, नगरसेविका आरती चोंधे, नीता पाडाळे, सुनिता तापकीर, सविता खुळे, पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे गिरीश प्रभुणे, चिंचवड विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, शुभम नखाते, संतोष ओझा, विना सोनवलकर, छत्रभुज झाडे, शशिकांत करुटे, सुभाष बनकर, अजय वाकोडे, अविनाश भंडारे, किशोर जानराव, विनोद भिसे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे उपशहराध्यक्ष हरेश तापकीर यांनी केले. तर राज तापकीर यांनी आभार मानले.