MPSC परीक्षार्थींसाठी महत्वाची बातमी! डिसेंबरच्या ‘या’ तारखेला सहा केंद्रावर होणार MPSC ची मुख्य परीक्षा

30

पिंपरी, दि.१४ (पीसीबी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020, दिनांक 4, 5 आणि 6 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. सहा केंद्रावर MPSC ची मुख्य परीक्षा होणार आहे.

आयोगाकडून प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक 21 मार्च 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 च्या दिनांक 6 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020, दिनांक 4, 5 आणि 6 डिसेंबर 2021 रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

WhatsAppShare