खासदार पूनम महाजन शनिवारी युवकांशी साधणार संवाद

139

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – भारतीय युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन शनिवारी (दि. ५) ‘कॉफी विथ यूथ’ या कार्यक्रमात शहरातील युवकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात त्या १८ ते ३० वयोगटातील युवक युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकालात झालेल्या विविध विकास कामांविषयी व पक्षाच्या आगामी ध्येयधोरणांविषयी खासदार महाजन माहिती देणार आहेत.

शनिवारी दुपारी ११ वाजता पिंपळे सौदागर येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल (कापसे लॉन ते कोकणे चौक रस्त्यावर) येथे भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष व नगरसेवक रवी लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास तरुणांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक दीपक नागरगोजे यांनी केले आहे.

या कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष व नगरसेवक रवी लांडगे, महापौर राहुल जाधव, पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर कार्यकारीणी पदाधिकारी व भाजपाचे नगरसेवक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख अमोल दामले यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

WhatsAppShare